Police Team esakal
नाशिक

Nashik Crime News : नांदूर शिंगोटे दरोड्यातील 7 जण जेरबंद

अजित देसाई

सिन्नर (जि. नाशिक) : दिवाळी सणाच्या तोंडावर नांदूर शिंगोटे ता. सिन्नर येथे दोन बंगल्यांमध्ये प्रवेश करून धाडसी दरोडा टाकणाऱ्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व वावी पोलिसांनी समांतर तपास करत बेड्या ठोकल्या. नांदूर शिंगोटेसह सिन्नर तालुक्यात मिरगाव, पाथरे, मनेगाव येथे देखील घडफोड्या केल्याची कबुली या दरोडेखोरांनी दिली. विविध ठिकाणी चोरीस सुमारे 5 लाख 70 हजार रुपयांचे 127 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच सिन्नर, वाडीवहृरे, मनमाड, वडनेर भैरव, शिंदे येथून चोरलेल्या दुचाकी व मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत करण्यात यश मिळवले. (7 people in Nandur Shingote robber jailed Nashik Crime News)

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. नांदूरशिंगोटे गावात संतोष गंगाधर कांगणे व रमेश तुकाराम शेळके यांचे घरामध्ये गेल्या 24 ऑक्टोबरच्या रात्री अज्ञात 6 दरोडेखोरांनी दरवाजाचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून लोखंडी पहार व चाकुचा धाक दाखवून, घरातील सदस्यांना काठीने मारहाण करून सोन्याचे दागिने व पावणेतीन लाखांची रोख रक्कम रोख रक्कम असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरून नेला होता.

या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप व अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांनी तात्काळ दरोडा पडलेल्या घटनास्थळास भेट देऊन आरोपींचा शोध घेणेसाठी मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकांनी तपास सुरू केला होता.

घटनास्थळावर मिळुन आलेले सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आरोपींचे अंगावरील कपडे व वर्णनाप्रमाणे तसेच गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून गोपनीय माहिती घेऊन तपास पथके रवाना रवाना करण्यात आली होती. राजदेरवाडी, ता. चांदवड येथुन संशयीत रविंद्र शाहु गोधडे (वय १९), सोमनाथ बाळु पिंपळे (वय २०), करण नंदू पवार (वय १९) दोघे रा. लासलगाव, दिपक तुळशीराम जाधव, रा. चंडिकापुर, वणी, ता. दिंडोरी यांना ताब्यात घेतले पोलीस पथकांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दिवाळीचे दिवशी पहाटेचे सुमारास त्यांचे साथीदारांसह नांदूरशिंगोटे येथील दरोडयाचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्यांचे साथीदार सुदाम बाळु पिंपळे, रा. राजदेरवाडी, ता. चांदवड, बाळा बाळु पिंपळे, करण उर्फ दादु बाळु पिंपळे, दोघे रा. गुरेवाडी (सिन्नर) यांना देखील पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत त्यांच्याकडून गुन्ह्यांची कबुली मिळवली. त्यांनी सिन्नर तालुक्यात मिरगाव, पाथरे, मनेगाव व सिन्नर येथील घरफोडयांची देखील कबुली दिली. चोरीस गेलेले सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, गंठन, पॅन्डल, कानातले वेल, सोन्याची चैन, अंगठी, डोरले, नथ, झुबे, पोत असे पाच लाख 70 हजार रुपये किमतीचे १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने, ०८ मोबाईल फोन, ०५ मोटर सायकली असा 9 लाख 2 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि सागर शिंपी, सपोनि मयुर भामरे, वावी पोलीस ठाण्याचे सपोनि सागर कोते, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक ज्ञानदेव शिरोळे, हवालदार रविंद्र वानखेडे, जालिंदर खराटे, नवनाथ सानप, दिपक आहिरे, विनोद टिळे, सुशांत मरकड, सचिन पिंगळ, विश्वनाथ काकड, प्रितम लोखंडे, सागर काकड, मंगेश गोसावी, संदिप लगड, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, उदय पाठक, वसंत खांडवी, नामदेव खैरणार, भगवान निकम, प्रशांत पाटील, गणेश वराडे, सतिष जगताप, नवनाथ वाघमोडे, वावी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रकाश गवळी, उपनिरीक्षक विजय सोनवणे, उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर, प्रवीण अढांगळे, सतीश बैरागी, दशरथ मोरे, नितीन जगताप, गोविंद सुर्यवाड, सुधाकर चव्हाणके, योगेश शिंदे, पंकज मोंढे, भास्कर जाधव, रत्नाकर तांबे, नवनाथ आडके यांनी तपास मोहिमेत सहभाग घेतला.

25 हजारांचे बक्षीस....

सुदाम पिंपळे, बाळा पिंपळे व करण पिंपळे या तिघांना सोलापूर जिल्ह्यातील बाभूळगाव येथून पोलीस पथकाने ताब्यात घेतले. त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक दोन दिवस वेषांतर करून त्याठिकाणी तळ ठोकून होते. पकडलेले सर्वच जण सराईत गुन्हेगार असून नाशिक जिल्ह्यासोबतच बारामती येथे देखील घरफोडी, दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघड झाला आहे. या कामगिरी बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस पथकांना 25 हजार रुपये बक्षीस देऊन गौरवले.

चोरीच्या दुचाकीने दाखवला माग....

पाथरे परिसरात घरफोड्या झाल्या त्या दिवशी चोरत्यांनी त्यांच्या जवळची दुचाकी सोडून देत एका वस्तीवरून दुसरी दुचाकी लांबवली होती. सोडून दिलेली दुचाकी वडनेर भैरव येथून चोरीला गेली होती व तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असणारे चोरटे व नांदूर शिंगोटे येथील चोरत्यांच्या हालचाली एकच असल्याचे सहाय्यक निरीक्षक कोते यांच्या लक्षात आले. वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी संशयितांचा माग काढत संशयित गोधडे याच्या मुसक्या आवळल्या व त्यानंतर संपूर्ण टोळीचा पर्दापाश झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT