Nashik News : तालुक्यातील वावी येथे सिन्नर-शिर्डी महामार्गालगत शेतातील घरात गोण्यांमध्ये साठवून ठेवलेले सुमारे १५ क्विंटल सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी (ता. ११) मध्यरात्री घडली. (70 thousand worth of soybeans storey house Theft by thieves Nashik News)
याच घटनेत चोरट्यांनी डाळिंब बागेसाठी आणलेली अठरा हजार रुपये किमतीची औषधी देखील लंपास केली.
वावी-पांगरी शिवेवर शिर्डी महामार्गालगत आसिफ वजीर शेख यांचे शेत आहे. तेथे त्यांनी डाळिंब लागवड केली असून गेल्या हंगामात काढणी केलेले सोयाबीन शेतातील घरामध्ये साठवून ठेवले होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
साधारणपणे ८० किलो क्षमतेच्या वीस बॅगमध्ये हे सोयाबीन साठविण्यात आले होते. चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजा कुलूप तोडून उघडला व आत मध्ये प्रवेश करून गोणीत साठवून ठेवलेले सुमारे ७० हजार रुपये किमतीचे सोयाबीन व शनिवारी सिन्नर येथून आणलेले डाळिंब बागेचे अठरा हजार रुपये किमतीचे औषध चोरून नेले.
रविवारी सकाळी श्री. शेख डाळिंब बागेला औषध फवारणी करायची असल्याने शेतावर आले असता त्यांना खोलीचा दरवाजा कुलूप तोडलेल्या अवस्थेत उघडा दिसला. त्यांनी आत डोकावून पाहिले असता सोयाबीन व औषधे चोरीला गेल्याचे उघड झाले.
या प्रकरणी वावी पोलिस ठाण्यात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय सोनवणे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.