Crime News esakal
नाशिक

Nashik Crime: यात्रेत मौजमजा करण्यासाठी चोरले 75 हजार; दोघांना अटक, 3 विधी संघर्षित बालकांचा गुन्ह्यात सहभाग

अजित देसाई

सिन्नर : भगूर येथील ग्रामदैवत श्री रेणुका देवीच्या यात्रेत मौजमजा करण्यासाठी पैसे हवेत म्हणून दि.23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री सिन्नर- घोटी महामार्गावर आगासखिंड येथील भंगार व्यवसायिकाच्या दुकानात असलेली 75 हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल फोनची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

याच गुन्ह्यात आणखी तीन विधी संघर्षित बालकांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. (75 thousand stolen for fun in bhagur devi Yatra Two arrested 3 under aged children involved in crime Nashik Crime)

आगासखिंड येथील अमित स्क्रॅप सेंटर या दुकानातून रात्रीच्या सुमारास दूकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली 75 हजार रूपये रोकड व दुकान मालकाचा मोबाईल फोन चोरीस गेला होता. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील हे या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

सदर चोरी लहवित ता. नाशिक येथील आदीत्य सुधीर सौदे व त्याच्या साथीदारांनी केलेली असुन ते सध्या औंध (पुणे) येथे निघुन गेले असल्याची गुप्त माहिती निरीक्षक श्री. पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार गून्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्ष दत्ता कांभिरे, सहाय्यक उपनिरीक्षक शांताराम नाठे, दिपक अहीरे , पोलीस नाईक विनोद टिळे, गिरीष बागुल, अनुपम जाधव, तांत्रिक विश्लेषन शाखेचे हेमंत गिलबिले , प्रदीप बहीरम यांच्या पथकाने औंध परिसरातून आदित्य सौदे यास ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. सदर चोरी अनिकेत अनिल उमाप रा. भगुर व त्याचे पुणे येथील तीन मित्रांसोबत येवुन केल्याचे त्याने सांगितले.

हे सर्वजण भगूर येथे रेणुका मातेच्या यात्रेत एकत्र आले होते. यात्रेत खर्च करण्यासाठी पैसे हवेत म्हणून त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी अनिकेत उमाप यास भगुर येथुन ताब्यात घेतले.

चोरीस गेलेल्या रकमेपैकी पंधरा हजार रुपये व मोबाईल फोन त्यांच्याकडून जप्त करण्यात आला तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील पोलिसांनी हस्तगत केली.

या गुन्ह्यात आणखी तीन जणांचा सहभाग होता. मात्र, ते तीनही जण विधी संघर्षित बालके असल्याने त्यांची ओळख पोलिसांकडून सांगण्यात आली नाही. ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना सिन्नर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adar Poonawalla: पुण्याच्या बॅटमॅनने 1,000 कोटींना विकत घेतले करण जोहरच्या 'धर्मा'चे 50 टक्के शेअर्स

Assembly Elections 2004 : 'या' पक्षाची उमेदवारी नरसिंगरावांनी स्वीकारली आणि फक्त 11 मतांनी ते विजयी झाले'

Diwali 2024 Gift Idea: दिवाळीत मित्र अन् नातेवाईकांना द्या अप्रतिम भेटवस्तू, 500 रुपयांपेक्षा कमी बजेटमधील गिफ्टची यादी वाचा एका क्लिकवर

ऋषी कपूर यांच्या अचानक निधनाने अशी झालेली कपूर कुटुंबाची अवस्था; लेक रिद्धिमा म्हणाली- तोंडावर दाखवत नसले तरी...

Ranji Trophy 2024: Cheteshwar Pujara ने ६६वे शतक झळकावले, ब्रायन लाराला मागे टाकले; टीम इंडियाचे दार ठोठावले

SCROLL FOR NEXT