scholarship News sakal
नाशिक

Nashik News : आठवीचे 765, पाचवीचे 833 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक; शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेतर्फे २०२२ मध्ये घेतलेल्‍या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) या परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. जिल्ह्यातून आठवीचे ७६५ विद्यार्थी तर पाचवीचे ८३३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. (765 students of 8th 833 students of 5th scholarship holders Final result of scholarship exam announced Nashik News)

महाराष्ट्र राज्‍य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै २०२२ ला परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्‍या गुणवत्ता याद्या काल (ता.३) रात्री नऊला परिषदेच्या संकेतस्‍थळावर जाहीर झाला आहे. तत्‍पूर्वी तात्‍पुरती गुणवत्ता यादी ७ नोव्‍हेंबर २०२२ ला जाहीर केली होती. गुणपडताळणीसाठी मुदत दिल्‍यानंतर प्राप्त अर्ज निकाली काढून अंतिम निकाल जाहीर केला आहे.

पात्र ठरलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या अशी

इयत्ता आठवीच्‍या १७ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी १६ हजार ४०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १ हजार ६३३ पात्र ठरले असून, उर्वरित १४ हजार ७७२ अपात्र ठरले आहेत. पात्रतेची टक्‍केवारी ९.९५ टक्‍के आहे. दरम्‍यान शिष्यवृत्तिधारक विद्यार्थ्यांची संख्या ७६५ आहे.

इयत्ता पाचवीतील २० हजार ९२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यापैकी १९ हजार ४३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातून ४ हजार २४८ विद्यार्थी पात्र ठरले होते. उर्वरित अपात्र १५ हजार १८४ अपात्र ठरले. पात्रतेचे प्रमाण २१.८६ टक्‍के राहिले. दरम्‍यान शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ८३३ इतकी आहे.

हेही वाचा : ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

राज्‍यस्‍तरीय गुणवत्ता यादीत सात विद्यार्थी

राज्‍यस्‍तरीय गुणवत्ता यादीत जिल्‍ह्‍यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये इयत्ता पाचवीतील सीबीएसई, आयसीएसईच्‍या राज्‍यस्‍तरीय गुणवत्ता यादीत सिम्‍बॉयसीस माध्यमिक विद्यालयातील निहार पराग देशमुख (९२.६२ टक्‍के) याने चौथा क्रमांक पटकावला आहे.

याच शाळेतील गार्गी सचिनकुमार दहिवलकर (८७.९२ टक्‍के) हिने दहावा क्रमांक पटकावला आहे. इयत्ता आठवीसाठी लासलगावच्‍या लोकनेते दादाजी पाटील माध्यमिक विद्यालयातील स्‍मित महेश निकम याने ९१.९५ टक्‍के गुणांसह गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

इयत्ता आठवीच्‍या सीबीएसई, आयसीएसईच्‍या राज्‍यस्‍तरीय गुणवत्ता यादीत लिटल एंजल प्रायमरी स्‍कूलच्‍या रिद्धी अविनाश पवार (८२.५५ टक्‍के), हिने अकरावा, गार्गी राहुल जोशी (८१.८८ टक्‍के) बारा, चिन्‍मय अजय पाटील (८१.८८) यांनी संयुक्‍तरित्‍या बारावा क्रमांक तर सोहम संजय कलोगे (८०.५४ टक्‍के) याने गुणवत्ता यादीत चौदावा क्रमांक पटकावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT