SMBT Hospital esakal
नाशिक

SMBT हॉस्पिटलमध्ये हृदयाच्या झडपांच्या 48 तासात 8 शस्त्रक्रिया

- प्रशांत कोतकर

नाशिक : वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वपूर्ण ठरतो आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चॅरिटेबल हॉस्पिटल एसएमबीटी हॉस्पिटलच्या (SMBT Hospital) हार्ट इन्स्टिट्यूटमधील हृदयविकार तज्ज्ञांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अत्यंत जटिल समजल्या जाणाऱ्या हृदयाच्या झडपांच्या (Heart valves) यशस्वी शस्त्रक्रिया केल्या ४८ तासात ८ शस्त्रक्रिया (Surgeries) पूर्ण केल्या असल्याची माहिती एसएमबीटी हॉस्पिटल प्रशासनाने दिली. (8 surgeries in 48 hours of heart valves at SMBT Hospital by new technology Nashik News)

हृदय शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. विद्युतकुमार सिन्हा यांनी अधिक माहिती देताना सांगितले, की हृदयात कृत्रिम झडप प्रत्यारोपण तसेच झडप दुरुस्त करणे ही जटिल आणि महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया आहे. केवळ दोन दिवसात हृदयातील झडपा खराब झालेल्या आठ रुग्णांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात काही रुग्णांच्या हृदयात कृत्रिम झडप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तर काहींच्या झडपा दुरुस्त करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियांकरिता गुजरात येथील अहमदाबाद हार्ट हॉस्पिटलचे हृदयरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. प्रियंकर सिन्हा हे देखील उपस्थित होते.

झडप दुरुस्त करण्याला प्राधान्य

डॉ. सिन्हा म्हणाले, की एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हार्ट इन्स्टिट्यूट हा पूर्णपणे स्वतंत्र विभाग आहे. येथे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पूर्णवेळ कार्यरत असते. या इन्स्टिट्यूटमधील उपलब्ध सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणे याचा हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर्स हे प्रत्यक्ष आणि प्रभावी वापर करतात. उत्तर महाराष्ट्रात केवळ एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपकरणे असून हृदय विकारांवरील सर्वच शस्त्रक्रिया या केवळ येथेच होतात. राज्यभरातून रुग्ण येथे शस्त्रक्रियांकरिता येतात. चेस्ट एक्स-रे, ईसीजी, कोरोनरी एंजियोग्राफी, स्ट्रेस टेस्ट आणि कार्डियाक एमआरआय आदी तपासण्या केल्यानंतर हृदयरोगाचे निदान होते. हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया करताना रुग्णांच्या वयाचा विचार करणे देखील तितकेच महत्त्वपूर्ण असते. हृदयाची झडप बदलणे आणि हृदयाची झडप दुरुस्त करणे, अशा दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. लहान बालकांच्या हृदयाची झडप दुरुस्त करण्याला प्राधान्य दिले जाते, जेणे करून भविष्यात ते चांगले जीवन जगू शकतील, असेही डॉ. सिन्हा यांनी सांगितले.

"हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही दोन दिवसात ८ शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या. यात १२ वर्षाच्या बालिकेसोबतच मध्यम वयाच्या आणि वयोवृद्ध व्यक्तींच्या देखील हृदयाच्या झडपांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बालिकेला त्रास होत असताना हृदयविकारासंदर्भाने तपासणी केली असता तिच्या हृदयाच्या मिट्रल झडपेला त्रास होता. जन्मजात हृदयाला मोठे छिद्र होते. तिच्या वयाचा विचार करत हृदयाची झडप दुरुस्त करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे ती देखील आता सर्वसामान्य मुलींप्रमाणेच आनंदात जीवन जगू शकणार आहे. तिला कायम स्वरूपी कुठल्याही औषधोपचारांची गरज नाही."

- डॉ. विद्युतकुमार सिन्हा, हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख, एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्यूट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT