कळवण : आदिशक्तीच्या पीठांपैकी श्री क्षेत्र सप्तशृंग गडावरील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारने ८१ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. निधीतून गडाचा कायापालट होणार आहे. घाटात दरड प्रतिबंधक उपाययोजना, अद्ययावत नवीन बसस्थानक, पोलिस ठाण्याच्या इमारतीसह भक्तनिवास अशी कामे होतील.
कळवण-सुरगाणाचे आमदार नितीन पवार यांनी ही माहिती दिली. सारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती कळवणचे आमदार नितीन पवार यांनी दिली. (82 crore approved for Shree Kshetra Saptshring Fort development works Nitin Pawar Nashik News)
गडावर शारदीय नवरात्रोत्सव आणि चैत्रोत्सवात यात्रा भरते. याशिवाय वर्षभर देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक गडावर येतात.
सोयी-सुविधांअभावी भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. गडावर पायाभूत सोयी-सुविधा पुरवून पर्यटन वाढीला चालना देण्याची गरज लक्षात घेऊन श्री. पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील यंत्रणांची बैठक घेत सूचना केल्या होत्या.
श्री. पवार यांनी गडावरील सुचवलेल्या विकासकामांचा उच्चाधिकारी समितीच्या सूचनेनुसार मूळ आराखड्यात बदल करीत सुधारित आराखडा अंदाजपत्रकांसह राज्य सरकारला सादर करण्यात आला होता.
हा आराखडा अंतिम करण्यात आला असून, राज्य सरकारने गडाच्या विकासासाठी निधी मंजूर केला आहे.
विकासकामांसाठीचा मंजूर निधी
श्री क्षेत्र सप्तशृंग देवी गडावरील विकासकामांसाठी मंजूर झालेला निधी रुपयांमध्ये असा : स्वच्छता गृह बांधणे- एक कोटी ५२ लाख ३४ हजार, भाविकांसाठी डोम बांधणे-तीन कोटी ९१ लाख ५० हजार, गटार व रस्त्यांचे बांधकाम करणे- चार कोटी ५९ लाख ६१ हजार,
गडावर ११ किलोवॉट व एलटी लाइट भूमिगत करणे-पाच कोटी ४४ लाख ४१ हजार, विविध ठिकाणी हायमास्ट बसविणे-३२ लाख ३१ हजार, टोलनाका ते शिवालय तलावापर्यंत पथदीप बसविणे- ५७ लाख ३२ हजार,
विविध ठिकाणी पथदीप बसविणे-५३ लाख ३७ हजार, दरड प्रतिबंधक उपाययोजनेंतर्गत बसविलेल्या जाळीची देखभाल दुरुस्ती करणे- एक कोटी ९२ लाख, गड-नांदुरी-अभोणा-कनाशी-मानूर-आलियाबाद रस्ता यामध्ये दरड प्रतिबंधक उपाययोजना करणे- ३५ कोटी, गडावर भक्तनिवास बांधणे-आठ कोटी ५१ लाख,
पोलिस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम-सात कोटी ७१ लाख, नांदुरी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाचे बांधकाम-पाच कोटी ५० लाख, वन विभागाच्या जमिनीवर विविध विकासकामे करणे- चार कोटी ३७ लाख, वनविभागाच्या जमिनीवर नक्षत्र उद्यान तयार करणे-एक कोटी ९३ लाख.
"कळवण येथील शेतकरी, कृतज्ञता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्तशृंग गड तीर्थक्षेत्र विकासाचा आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्याची घोषणा केली होती. ८ ऑक्टोबरला शिखर समितीच्या बैठकीत प्रशासकीय मान्यता देत कळवणकरांना दिलेला शब्द अजित पवार यांनी खरा ठरवला. ३० नोव्हेंबरला निधी मंजूर झाल्याने गडासह तीर्थक्षेत्राचा कायापालट होईल." -आमदार नितीन पवार, कळवण-सुरगाणा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.