नाशिक : जिल्ह्यात कोरोनाची(nashik corona update) पकड मजबूत होत चालली आहे. शुक्रवारी (ता.१४) नाशिक महापालिका(nashik corporation) क्षेत्रातील एक हजार ५०३ बाधितांसह जिल्ह्यात एकूण एक हजार ९९६ बाधित आढळले. एक हजार ०९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मृतांचा आकडा निरंक राहिला. उपचार घेणाऱ्या बाधितांच्या संख्येत ८९७ ने वाढ झालेली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आठ हजार ७१२ वर पोचली आहे. (8712 corona active patients in Nashik district)
शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रात एक हजार ३६८, नाशिक ग्रामीणमधील ४२८ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. मालेगाव महापालिका क्षेत्रातील ४७, जिल्हा बाहेरील ८२ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मृतांची संख्या निरंक राहिल्याची दिलासादायक बाब आहे. सायंकाळी उशिरापर्यंत दोन हजार ५११ रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी सर्वाधिक एक हजार ८६३ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. नाशिक शहरातील ५२१, मालेगावच्या १२७ रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा आहे.
शुक्रवारी जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांनुसार(corona testing ) जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ३९.०५ टक्के राहिला. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर ३८.८६ टक्के, नाशिक ग्रामीणमधील पॉझिटिव्हीटी दर ३९.५७ नोंदविला गेला आहे.
ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती अशी
नाशिक महापालिका क्षेत्र ६ हजार ९४०
नाशिक ग्रामीण क्षेत्र १ हजार २५०
मालेगाव महापालिका क्षेत्र १६८
जिल्हा बाहेरील बाधित ३६३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.