Villagers at the start of removal of silt from dam on Moti Nalla by JCB esakal
नाशिक

Nashik: पाणी कारभारी प्रकल्पातंर्गत 9 गावे होणार गाळमुक्त; दिंडोरीतील नदी-नाल्यांवरील जुने जलसाठे होणार पुनरुज्जीवित

सकाळ वृत्तसेवा

वणी/मोहाडी : गोदरेज ॲग्रोवॅट व वॉटरशेड ऑरगनाझेशन संस्थेच्या पाणी कारभारी प्रकल्पातंर्गत ग्रामस्थांच्या सहभागातून नैसर्गिक स्रोताचे व्यवस्थापन (पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम) अंमलबजावणी, नदी-नाल्यावरील जुने जलसाठे पुनरुज्जीवित करणे व जलसाक्षरता वाढविण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील खतवड, आंबे दिंडोरी, तळेगाव दिंडोरी, ढकांबे, अक्राळे, पिंपळणारे, आशेवाडी, मानोरी, गवळवाडी या नऊ गावांमध्ये विविध उपक्रम हाती घेतले असून, बंधाऱ्यामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्यास सुरवात करण्यात आल्याचे प्रकल्पाधिकारी नवनाथ पाचारणे यांनी सांगितले. (9 villages will become silt free under Pani Karbhari project old reservoirs on rivers and streams in Dindori will be revived Nashik)

नऊ गावांची एप्रिल २०२३ ते मार्च २०२६ तीन वर्षांसाठी निवड झाली असून, प्रकल्पांतर्गत वॉटर शेड ऑरगनाझेशनचे वरिष्ठ अधिकारी गणेश राजापुरे , प्रकल्पाधिकारी नवनाथ पाचारणे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली खतवड शिवारातील मोती नाल्यावरील सहा सिमेंट बंधाऱ्यामधील गाळ काढण्याचे व दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.

इतर आठ गावांतील बंधाऱ्यामध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढण्यास सुरवात झाली आहे. यातून नदी, नाले व जुने जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन होणार आहे. परिघातील विहीर-कूपनलिका व जमिनीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे.

आवश्यक तेथे नवीन सिमेंट बंधारे बांधण्यात येत आहेत. खतवड व गवळवाडी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आधुनिक हवामान दर्शकयंत्र बसविले असून, दहा किलोमीटर अंतरावरील गावांना पावसाचा अंदाज, तापमान, आर्द्रता, हवेचा दाब, वाऱ्याचा वेग, दिशा यासारखी उपयुक्त माहिती मिळणार आहे.

नऊ गावांमधील गरजू शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देण्यात येत आहे. सवलतीच्या दरात नामाकिंत ड्रीप, मल्चिंग पेपर, गांडूळ खतनिर्मिती बेड व फळबाग योजना राबविण्यात आली. महिला बचत गटांना प्रत्येकी पाच हजार अनुदान देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे व विषमुक्त शेतीचा अवलंब करावा, यासाठी देशी गाईचे गोमूत्र, शेण, गूळ, बेसन पीठ, वारूळाची मातीपासून कमी खर्चात सेंद्रीय जीवामृत स्लरी बनविण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, खतवड येथील महिला शेतकऱ्यांनी एकाच दिवशी एकाच वेळी सुमारे १५ हजार लिटर जीवामृत स्लरी बनवून विक्रम केला आहे.

हा प्रकल्प यशस्विपणे राबविण्यासाठी इंजिनिअर सुप्रिया शिंदे, नीलेश पगारे, नीलेश बागूल, युवराज साळवे, सरपंच, उपसरपंच, सदस्य, वसुंधरासेवक व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

खतवड येथील मोती नाल्यावरील बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सरपंच बबन दोबाडे, उपसरपंच सुकदेव खुर्दळ, प्रकल्पाधिकारी नवनाथ पाचारणे, अभियंता सुप्रिया शिंदे, सदस्य हरिसिंग माळेकर, अंबादास जाधव, भास्कर खुर्दळ, संपत खुर्दळ, दशरथ मुळाणे, नवनाथ मुळाणे, भाऊसाहेब हिरे, रावसाहेब खुर्दळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT