jal jeevan mission esakal
नाशिक

Jal Jeevan Mission : जिल्ह्यात जलजीवनच्या 90 विहिरी चाचणीत फेल; सर्वाधिक 66 विहिरींचा समावेश

पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे, उद्भव झालेल्या विहिरी फेल जात आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्याची लगीनघाई सुरू असताना दुसरीकडे, उद्भव झालेल्या विहिरी फेल जात आहेत.

मंजूर १२२२ पाणी पुरवठा योजनांपैकी ६०४ योजनांमधील विहिरींच्या उद्भवाची मे व जूनमध्ये भूजल शास्त्रज्ञांकडून तपासणी झाली. (90 water wells in district failed in test in jal jeevan mission nashik news)

त्यानंतर खोदलेल्या विहिरींपैकी आणखी ४० विहिरी कोरड्या गेल्याने या योजनेतील आतापर्यंत तब्बल ९० विहिरी कोरड्या गेल्या आहेत. यामुळे या ठिकाणी उद्भव विहिरींची जागा बदलून नवीन विहिरी खोदण्याची नामुष्की ओढवली आहे. यातील ६६ विहिरी या आदिवासी भागातील असून, सुरगाणा या एकमेव तालुक्यातील ३२ विहिरींचा यात समावेश आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने १४१० कोटींच्या १२२२ योजनांना मंजुरी दिली असून त्यातील ६०४ योजनांच्या विहिरींची कामे एप्रिलपर्यंत पूर्ण झाली. या ६०४ विहिरींच्या उद्भवाची चाचणी मे व जूनमध्ये झाली होती. त्यावेळी ५० विहिरी कोरड्या गेल्या होत्या.

त्यानंतर पुढे पावसाळा संपल्यानंतर आणखी विहिरींची कामे पूर्ण झाली असून त्यापैकी आणखी ४० विहिरी कोरड्या निघाल्या आहेत. यामुळे आतापर्यंत ९० पाणी पुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या गेल्याने तेथे नवीन विहिरी खोदण्यास ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने परवानगी दिली आहे. कोरड्या विहिरींपैकी सर्वाधिक विहिरी सुरगाणा व त्र्यंबकेश्वर या दोन तालुक्यांत आहेत.

सुरगाण्यात ३२ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात ११ विहिरी कोरड्या गेल्या आहेत. या विहिरींची उद्भव चाचणी मेमध्ये झाली होती. आतापर्यंत केवळ ६०४ विहिरींची उद्भव चाचणी झाली आहे. त्यानंतर खोदलेल्या विहिरींची अद्याप उद्भव चाचणी झालेली नसल्याने येत्या मेपर्यंत या नापास विहिरींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तालुकानिहाय कोरड्या विहिरी (कंसात विहिरींची संख्या)

निफाड (३), सिन्नर (३), नाशिक (३), मालेगाव (३), बागलाण ( २), कळवण ( ७), चांदवड ( ४), देवळा ( १), इगतपुरी (२), पेठ (५), सुरगाणा (३२), दिंडोरी (६), त्र्यंबकेश्वर (११), नांदगाव (४).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT