Nashik ZP News : शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद सेवेतील १०, २० आणि ३० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला जातो.
त्यानुसार, जिल्हा परिषदेतील सर्व विभाग व पंचायत समित्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. (95 employees of zp benefited from Assured Pragati Yojana nashik news)
प्राप्त झालेल्या ११३ प्रस्तावांपैकी ९५ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आला असून, याबाबत आदेश काढण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
या योजनेनुसार महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ व (सुधारित वेतन) नियम, २०१९ नुसार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतननिश्चिती केली जाते. सुधारित वेतन संरचना ही जिल्हा परिषद सेवेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत निर्देशित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रथम आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समितीची बैठक झाली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी भालचंद्र चव्हाण, जिल्हा समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत पवार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या समितीने प्राप्त सर्व प्रस्तावांची पडताळणी केल्यावर श्रीमती मित्तल यांनी विविध संवर्गांतील ९५ कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाचे आदेश निर्गमित केले.
या कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यासाठी परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोनाली भार्गवे, गणेश बगड, वरिष्ठ सहाय्यक भास्कर कुवर, सुनील थैल, कनिष्ठ सहाय्यक कानिफनाथ फडोळ, सरला सोनार आदींनी प्रयत्न केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.