A. Bh. Nashikkar literati along with Vilas Potdar, Rajendra Ugle gathered at the stall of Vaishali Prakashan at the Marathi Sahitya Sammelan venue SYSTEM
नाशिक

96th Marathi Sahitya Sammelan : संमेलनातील कट्ट्यांवर नाशिककरांचा प्रभाव!

तब्बल 30 साहित्यिकांचा विविध उपक्रमांत सहभाग

ब्रिजकुमार परिहार

नाशिक : अ. भा. मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक हे नातं तसं जुनंच. स्वातंत्र्यवीर सावरकर, तात्यासाहेब शिरवाडकर यांच्यापासून थेट ९४ व्या संमेलनापर्यंत ही परंपरा कायम आहे. त्यामुळे यंदाच्या ९६ व्या संमेलनावरही खास ‘नाशिक प्रभाव’ न दिसता तरच नवल. यंदा नाशिकचे तब्बल ३० साहित्यिक विविध कट्ट्यांवर ‘वन्स मोअर’ मिळवत हा ‘प्रभाव’ अधोरेखित करत आहेत. (96th akhil bhartiya Marathi Sahitya Sammelan 30 writers from nashik participated in various activities nashik news)

खरे तर वर्धा येथे सुरू असलेल्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित म्हणून नाशिकहून युवा कवी, अभिनेता व सूत्रसंचालक राजेंद्र उगले यांचे एकमेव नाव निमंत्रण पत्रिकेत बघावयास मिळाले.

त्यामुळे की काय, पण खास संमेलनासाठी एवढे लांबवर जाण्याबाबत येथील साहित्यिक वर्तुळात फारशी चर्चाच झाली नाही. तरीदेखील तब्बल ३० दर्दी नाशिककरांनी साहित्यिकांच्या मांदियाळीत उपस्थिती नोंदवली.

किंबहुना गझल कट्टा, कवी कट्टा, निमंत्रितांचे कवी संमेलन अन्‌ एकाच वेळी सुरू झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्याही निमित्ताने नाशिकचा विशेष प्रभाव वर्धा शहरात बघावयास मिळतोय.

या अनुषंगाने सगळ्याच मंडपामध्ये नाशिककर साहित्यिकांनी आपला ठसा उमटवला आहे. गझल कट्ट्यावर दमदार सादरीकरणाला ‘वन्स मोअर’ मिळू शकतो हे दाखवून देणारेही नाशिककरच आहेत. कवी कट्ट्यावरही हेच चित्र बघावयास मिळत आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

एकत्र भटकंती

संमेलनात वेगवेगळ्या कट्ट्यांवर सामील होण्यासाठी आले असले तरीही नाशिककर म्हणून सर्वजण एकत्र फिरत आहेत. त्यामुळे संमेलनस्थळी भेटणारे सारेच साहित्यिक, साहित्यप्रेमी त्यांच्याशी बोलताना नाशिकला भरलेल्या ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आठवणी सांगत भरभरून बोलत आहेत, हेच नाशिककरांसाठी विशेष आहे.

वैशाली प्रकाशन ‘मध्यवर्ती’

नाशिक व पुणे येथील वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार यांनी प्रकाशक म्हणून वर्धा येथील संमेलनातही स्टॉल उभारला आहे. त्यांच्या स्टॉलला या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. सर्वच नाशिककर साहित्यिकांनीही संमेलनाची आठवण म्हणून शनिवारी (ता. ४) अगदी ठरवून वैशाली प्रकाशनच्या स्टॉलवर एकत्र येत ग्रुप फोटो घेतला.

या वेळी श्री. पोतदार व श्री. उगले यांच्यासह सोमदत्त मुंजवाडकर, संजय गोरडे, माणिकराव गोडसे, श्रीमती महाजन, वैशाली शिंदे, प्रतिभा खैरनार, श्रीमती कवठेकर, श्रीमती मोरे, रतन पिंगट, किरण मेतकर, नंदकिशोर ठोंबरे, गोरख पालवे, संतोष वाटपाडे, काशिनाथ गवळी, बाळासाहेब गिरी, आकाश कंकाळ, सोमनाथ एखंडे, संजय मोरे, सुरेश खैरनार, सुभाष उमरकर, बालाजी नाईकवाडे आदी नाशिककर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT