MHT-CET Exam : सीईटी सेलतर्फे घेण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी २०२३ परीक्षेला मंगळवार (ता.९) पासून सुरवात झाली. परीक्षेच्या पहिल्या टप्यांत ‘पीसीएम’ ग्रुपची परीक्षा होत आहे.
पहिल्या दिवशी या परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, उपस्थितीचे प्रमाण तब्बल ९७ टक्के राहिले. दरम्यान भौतिकशास्त्र, आणि गणित विषयाच्या प्रश्नांची काठीण्यपातळी अधिक राहिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. (97 percent attendance for MHT CET Enthusiastic response on first day Maths Physics difficult nashik news)
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी.एस्सी (कृषी) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२३ परीक्षा घेतली जाते आहे. दोन टप्यांमध्ये होत असलेल्या या परीक्षेतील पहिल्या टप्यांत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची परीक्षा होते आहे.
मंगळवारपासून या परीक्षेला सुरवात झालेली असून, शनिवार (ता.१३) पर्यंत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर दुसऱ्या टप्यांत सोमवार (ता.१५) पासून २० मेपर्यंत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, आणि जीवशास्त्र (पीसीबी) या ग्रुपची परीक्षा घेतली जाणार आहे.
दरम्यान परीक्षेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. संगणकावर आधारित असलेल्या या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी उत्साहात विद्यार्थी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. वेळेचे योग्य समन्वय साधताना विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. भौतिकशास्त्र आणि गणिताच्या प्रश्नांची काठीण्यपातळी अधिक राहिल्याचे बहुतांश विद्यार्थ्यांनी सांगितले.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
पहिल्या दिवशीच्या उपस्थितीचा तपशील
जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात प्रविष्ट असलेल्या एक हजार ८४६ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ७९३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर उर्वरित ५३ विद्यार्थी गैरहजर होते. उपस्थितीचे प्रमाण ९७ टक्के राहिले.
तर दुपारच्या सत्रामध्ये प्रविष्ट असलेल्या एक हजार ८४८ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ८०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ४४ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर होते. दुपार सत्रातील उपस्थितीचे प्रमाण ९७.६ टक्के राहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.