Aadhaar of 600 Suman institution for safe motherhood nashik news 
नाशिक

Sakal Exclusive: सुरक्षित मातृत्वासाठी 600 सुमन संस्थांचा आधार! आरोग्य विभागाने कसली कंबर

सकाळ वृत्तसेवा

Sakal Exclusive : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला. तरीही राज्यात दरवर्षी हजारो बालकांच्या मृत्यूंची आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊन आदिवासी, ग्रामीण भागातील कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या कायम असल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून निदर्शनास येते.

त्यामुळे सुरक्षित मातृत्वासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यात २०२३-२४ साठी सुमारे ६०० संस्थांची विभागाने ‘सुमन’ संस्था म्हणून निवड केली. राज्यातील मातृत्वाची काळजी घेणाऱ्या संस्था सुमन संस्था म्हणून ओळखल्या जातील. (Aadhaar of 600 Suman institution for safe motherhood nashik news)

त्यामध्ये ५३८ आरोग्य संस्थांची सुमन ‘बेसिक' म्हणून, ४७ संस्थांची ‘बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रीक ॲण्ड न्यू बॉर्न केअर' आणि १५ संस्थांची ‘कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर' या प्रकारात समावेश करण्यात आला. आता आदिवासी भागात सुमन संस्थांनी प्रभावीपणे कामकाज करून बालमृत्यू, माता मृत्यूवर नियंत्रण मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांची सुमन संस्था म्हणून निवड करून त्यांच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून राज्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी विविध निर्णय घेण्यात येत असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार सुमन संस्थांची संकल्पना मूर्त रूपात आणण्यात येत आहे.

टाळता येण्यासारख्या कारणांनी माता आणि बाल मृत्यू, आजार संपुष्टात आणून प्रसूतीचा सकारात्मक अनुभव प्राप्त करणे हा उद्देश सुरक्षित मातृत्व आश्वासन कार्यक्रमाचे (सुमन) आहे. सुमन अंतर्गत सर्व लाभार्थींना उच्च दर्जाच्या वैद्यकीय व अत्यावश्यक सेवा, संदर्भ सेवा देणे, लाभार्थ्यांना उपलब्ध सोयी-सुविधांची नियमित माहिती देण्यासाठी आणि तक्रारींना तत्काळ प्रतिसाद देणारी प्रभावी आरोग्य सेवा प्रणाली निर्माण करणे, स्वयंसेवी संस्था, स्वयंसहाय्यता गट, लोकप्रतिनिधी यांची १०० टक्के माता मृत्यूच्या नोंदणीसाठी मदत घेणे, त्या मृत्यूच्या अन्वेषणासाठी जनजागृती निर्माण करणे, आरोग्यसेवा पुरवणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे ज्ञान, कौशल्य बळकटीकरण करून त्यांच्यामध्ये लाभार्थींच्या हक्काबाबत जागृती निर्माण करणे, लाभार्थ्यांना गुणात्मक सेवा देण्यासाठी प्रवृत्त करणे, आंतरविभागीय समन्वय साधण्यासाठी कृती योजना तयार करणे ही सुमन कार्यक्रमाची वैशिष्ट्य़े आहेत.

मोफत आरोग्यसेवा

कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या सर्व गर्भवती, नवजात बालकांना आवश्यक आरोग्यसेवा मोफत देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध संसाधनांच्या आणि सेवांच्या आधारावर सेवा हमी पॅकेजनुसार सुमन ‘बेसिक', सुमन ‘बेसिक इमरजन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर' आणि सुमन ‘कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर' याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आले आहे.

तसेच सुमन ‘कॉम्प्रेहेन्स‍िव्ह इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर' यामध्ये जिल्हा, महिला रुग्णालये व संदर्भ सेवा केंद्र यांचा समावेश आहे. सुमन ‘बेसिक इमर्जन्सी ऑब्सेट्रिक ॲण्ड न्यू बॉर्न केअर' यामध्ये पहिल्यांदा संदर्भ सेवा केंद्र नसलेल्या काही उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये यांचा समावेश आहे.

तसेच सुमन ‘बेसिक'मध्ये राज्यस्तरावरील संस्थांमध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला अधिक दर्जेदार व सहज आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातून राज्याची आरोग्य व्यवस्था आणखी बळकट होईल, असे आरोग्य विभागाला अपेक्षित आहे.

राज्यातील वर्षनिहाय बालमृत्यू

*२०१९-२० : १४ हजार ६१४
*२०२०-२१ : १३ हजार ९५९
*२०२१-२२ : १४ हजार २९६
*२०२२-२३ : १३ हजार ६५६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

Beed News : मुंडेंच्या जिल्ह्यात लक्ष्मण हाकेंच्या शब्दालाही मान

IND vs AUS : लपक-झपक... Dhruv Jurel चा अविश्वसनीय झेल, ऑस्ट्रेलियन फलंदाजही स्तब्ध, Video viral

IPL 2025 Auction Live: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजासाठी चेन्नई-मुंबईमध्ये चढाओढ! कोण आहे Anshul Kamboj?

SCROLL FOR NEXT