A team that takes care of the health of workers during Dindi. esakal
नाशिक

Aashadhi Wari 2023: दिंडीत वारकऱ्यांच्या आरोग्याचीही होतेय जपवणूक! अतिगंभीर आजारासाठी 108 रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा

Aashadhi Wari 2023 : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या वारीसोबत चालणारा प्रत्येक घटक हा पंढरीच्या विठुरायाच्या सेवेचाच भाग आहे. नाशिकच्या जिल्हा परिषद आरोग्य पथकही दिंडीत सहभागी असून, आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. हनुमान रामचंद्र पळवे व त्यांचे १४ जणांचे आरोग्य हे काम निष्ठा व सेवाव्रताने करत आहेत. (Aashadhi Wari 2023 health of Warkari being protected in Dindi 108 ambulances for critical illness nashik news)

निवृत्तिनाथांच्या पालखी प्रस्थानापासूनच जिल्हा परिषदेचे आरोग्य पथक वारकऱ्यांच्या सेवेत कार्यरत आहे. निवृत्तिनाथांच्या पालखीचा मुक्काम शनिवारी (ता. १०) श्रीरामपूर जवळील बेलापूर येथे बेलापूरकरांच्या मठात होता.

आजपर्यंत डॉ. पळवे यांच्या माहितीनुसार साधारणतः दररोज सुमारे एक हजार वारकरी औषध उपचारासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाकडे, रुग्णवाहिकीकडे येत असतात. अशा दोन रुग्णवाहिका वारीसोबत कार्यरत आहेत.

सध्या उष्णतेचा कडाका मोठा आहे. वारीसोबत ५० वय वर्षाच्या पुढील वारकरी मोठ्या प्रमाणात आहेत. आरोग्य बिघडण्याचा मुख्य स्रोत म्हणजे दूषित पाणी होय.

मात्र आरोग्य पथकातील कर्मचारी टँकरमधील पिण्याच्या पाण्याची ओ. टी. चाचणी घेऊन हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची खातरजमा करूनच ते वारकऱ्यांना ते पिण्याची परवानगी दिली जाते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दररोज दहा ते पंधरा सलाईन तसेच ३०/४० इंजेक्शन आणि काही गोळ्या औषधे वारकऱ्यांना लागत असल्याचे आरोग्य पथकाने ‘सकाळ’ला सांगितले. सातत्याने उन्हात चालून वारकऱ्यांचे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून त्यांना आरोग्य पथकातर्फे ओआरएसचे पॅकेट दिले जात आहे.

सोबतच अतिगंभीर आजारासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही कार्यरत आहे. ज्या-ज्या तालुक्याच्या ठिकाणी पालखी सोहळा दाखल होतो त्या त्या ठिकाणचे आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी नाशिकच्या पथकाला सहाय्यभूत ठरत आहेत.

या आरोग्य पथकामध्ये अधिकारी डॉ. निशा साठे, डॉ.मंगेश गायकर, औषध निर्माण अधिकारी सुखलाल कोर, सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेंद्र सातपुते, बाळासाहेब चौधरी, शरद घरटे, नयना वाघ, सिंधू जाधव तसेच परिचर बी एम खळदकर, सुनील साळुंखे, चालक नंदकिशोर सातपुते आणि सुभाष देवरे आदींच्या सहकार्यातून पंढरपूरच्या वारीवर ही आरोग्य पथक कार्यरत आहे. सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचीही एक रुग्णवाहिका पंढरपूरच्या मार्गावर निवृत्तिनाथांच्या वारीसोबत कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT