Nashik News : ‘ने मजसी ने परत मातृभुमीला, सागरा प्राण तळमळला’ मातृभूमीच्या ओढीने अशी आर्त साद घालणाऱ्या व तरुणाईच्या मनात स्वातंत्र्य व क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये उभारलेल्या अभिनव भारत संस्थेच्या इमारतीची अतिशय दुरवस्था झाली आहे. (Abhinav Bharat building is in great disrepair nashik news)
या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवतही उगवले आहे, परंतु याचे सोयरसुतक ना सत्ताधाऱ्यांना ना सावरकरांच्या नावावर स्वतःची दुकाने थाटत त्यावर पोळी भाजून घेणाऱ्यांना आहे. तरूणांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविण्यासाठी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नेहरू चौकालगतच्या तीळभांडेश्वर लेनमध्ये अभिनव भारत संस्थेची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी स्वखर्चाने केली.
सावरकरांच्या हयातील व त्यानंतरही या ठिकाणी क्रांतिकारक स्वातंत्र्यसैनिकांच्या बैठका रंगत असे. स्वातंत्र्यानंतर मात्र अभिनव भारत संस्थेकडे पुरेसे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणची दुरवस्था झाली असून मोठ्या प्रमाणावर गवतही उगवले आहे.
केवळ राजकारणासाठी सावरकर : खैरे
काहीतरी केले पाहिजे म्हणून थातूरमातूर काम केले. केवळ राजकारण म्हणून त्यांना सावरकर हवे. स्वातंत्र्यवीरांनी पदरमोड करून हे अभिनव भारत उभारले. तेवढ्यापुरते काम करून हे सावरकरांना विसरून गेले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ज्या ठिकाणी क्रांतीची ज्योत पेटविले ते ठिकाण जपणे गरजेचे आहे, परंतु ठिकाणी स्वातंत्र्यलढ्याचे काम सुरू झाले, त्याकडे साफ दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणाला भग्न स्वरूप झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक व स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी शाहू खैरे यांनी सांगितले.
या ठिकाणाला ऊर्जितावस्था प्राप्त होऊन ते तरुणांचे प्रेरणास्थान बनावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज माजी नगरसेवक व काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंतीसारख्या उत्सवाचे आयोजन सुरू केले.
सहा कोटींचा निधी मंजूर : आमदार फरांदे
मध्यंतरी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या ठिकाणी भेट देत अभिनव भारत संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनाकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. परंतु शिंदे सरकारने इतर कामांच्या स्थगितीबरोबरच या कामालाही स्थगिती दिली.
याबाबत आमदार फरांदे यांच्याशी संपर्क साधला असता, हे काम काही कारणाने थांबविण्यात आलेले असले तरी आता यासाठी सहा कोटींचा भरीव निधी प्राप्त करून त्याद्वारे या ठिकाणी तरुण पिढीला प्रेरणादायी असे अद्ययावत स्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.