Abhinav Bharat Mandir esakal
नाशिक

Nashik Abhinav Bharat Mandir : अभिनव भारत मंदिराचा होणार कायापालट; क्रांतिकारी चळवळींचे प्रमुख केंद्र

सकाळ वृत्तसेवा

Nashik Abhinav Bharat Mandir : स्वातंत्र्यवीर सावरकर, देशभक्त बाबाराव सावरकर आणि स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद या तीन महान देशभक्तांचे काहीकाळ वास्तव्य राहिलेल्या आणि तत्कालीन क्रांतिकारी चळवळींचे प्रमुख केंद्र असलेल्या नाशिकमधील अभिनव भारत (Nashik News) मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. (Abhinav Bharat Mandir is going to get makeover soon nashik news)

त्यासाठी राज्य सरकारने सहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. वास्तुचे नाव अभिनव भारत मंदिर असे असले तरी हा वाडा सद्यःस्थितीला अत्यंत मोडकळीस आलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे अमूल्य योगदान राहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अनेक योजना या नाशिकच्या तीळभांडेश्वर लेनमधील ज्या वाड्यात आखल्या त्याला स्वातंत्र्यसैनिकांनी अभिनव भारत मंदिर असे नाव दिले.

या ठिकाणी आपल्याला (कै.) बाबाराव सावरकर सभागृह, वि. ना. देशपांडे कक्ष, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यालय, हुतात्मा अनंत कान्हेरे कक्ष बघायला मिळतो. देशभक्तीच्या या पाऊलखुणा जतन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी सहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

२६ फेब्रुवारी २०१८ ला अभिनव भारत मंदिर येथे झालेल्या सावरकर पुण्यतिथी कार्यक्रमात आमदार देवयानी फरांदे यांनी या मंदिराच्या नूतनीकरणाची घोषणा केली होती. अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने आता नवीन आराखडा तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा आराखडा पाठविण्यात आला आहे. आमदार फरांदेंच्या प्रयत्नांतून आता त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली जात आहे.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

१८९९ ते १९०९ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यादरम्यान त्यांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना करून क्रांतिकारी आंदोलनांचे रणशिंग फुंकले. इंग्रजांविरोधातील रणनीती याच ठिकाणी आखली जायची. याची माहिती आता नाशिककरांना याठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. साधारणतः महिन्याभराच्या निविदाप्रक्रियेनंतर मंदिर जीर्णोधाराचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे समजते.

तुळशीवरही देशभक्तीचा संदेश

अभिनव भारत मंदिरात प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या तुळशीवर देशभक्तीचा संदेश बघायला मिळतो. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय. ब्रिटिशांशी झालेल्या स्वातंत्र्य युद्धात १८५७ पासून ते १९४७ पर्यंत सशस्त्र समरांत झुंजत आलेल्या सर्व दिवंगत भारतीय हुतात्मांना आणि वीरात्मांना श्रद्धांजली, समर्पण असा संदेश आपल्याला वाचायला मिळतो. ही वास्तू देशभक्तीने आपल्याला भारावून टाकते.

काय असेल नवीन वास्तूत

- बाबाराव सावरकर, अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे यांच्या नावाने दालने उभारणार

- तुळशी वृंदावनावर १८५७ ते १९४७ यादरम्यान हुतात्मा झालेल्यांची नावे कोरण्यात येतील

- स्वातंत्र्यदेवतेची स्थापना करण्यात येणार

- या देवतेच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्य, तलवार अशी आयुधे

- मिनी थिएटर, अद्ययावत ग्रंथालय, सावरकरांची विज्ञानदृष्टी याविषयी संग्रहालय

- १८५७ ते १९४७ या दरम्यानच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचे फोटो

- डिजिटल माहिती दालन, सावरकरांचे समग्र साहित्य, मराठी शब्दकोश

- स्वातंत्र्य चळवळीतील फोटोंची गॅलरी, प्रदर्शन हॉल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT