Sapna Patil (Deore) with baby. Traveling women helping neighbors. esakal
नाशिक

Child Birth In Train : अभोणा माहेरवाशिणीने रेल्वेत दिला गोंडस बाळाला जन्म!

सकाळ वृत्तसेवा

अभोणा (जि. नाशिक) : येथील माहेरवाशीण सपना पाटील(देवरे), कजगाव (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी व भारतीय सैन्यात लष्करी जवान म्हणून कार्यरत असलेले पती भूषण संजय पाटील हे सपना पाटील यांच्या प्रसूतीसाठी कन्येसमवेत अभोणा गावाकडे येत असताना रविवारी (ता. २) रेल्वेतच गोंडस मुलाला जन्म दिला. आई व बाळाची तब्बेत ठणठणीत असून, दोन्ही आपल्या मायभूमीच्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले आहेत.

भूषण पाटील हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षादलात (बीएसएफ) पश्‍चिम बंगाल येथे कार्यरत आहेत. अभोणा हे सपनाचे माहेर. आई अक्काबाई देवरे येथील डांग सेवा मंडळाच्या जनता विद्यार्थी वसतिगृहात स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. सपना प्रसूतीसाठी पती व मुलीसह बंगालहून गावाकडे येत असताना कर्मभूमी एक्स्प्रेसमध्ये प्रवासासाठी बसले.

मात्र, रेल्वे प्रवासात रामपुरहाट (पश्‍चिम बंगाल) येथेच त्यांना प्रसूती कळा जाणवायला लागल्या. रेल्वेतच त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. या वेळी कर्मभूमी एक्स्प्रेसमधील अन्य महिला प्रवाशांनी व रेल्वे अधिकाऱ्यांनी सहकार्य करून त्यांना मदत केली. योगायोगाने महिला प्रवाशांमध्ये नर्सिंग प्रशिक्षण घेणारी एक विद्यार्थिनी सहप्रवासी असल्याने प्रसूती सुखरूप होऊन ते पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले.

सध्या संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. खडतर आणि अडचणीच्या काळातही एका गोंडस बालकाला रेल्वे प्रवासात जन्म दिल्यामुळे सपना खरी दुर्गा ठरली आहे. भूषण व सपना यांना नवरात्रोत्सव काळात एक पाहूणा म्हणून गोंडस बाळ घरी आल्याने सैनिक दाम्पत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ?

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT