Nashik News : सिंहस्थात रामतीर्थावर महिलांसाठी वस्त्रांतरगृह हवे, म्हणून दोनमजली इमारत बांधण्यात आली खरी. परंतु कपडे बदलण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर जाणे शक्य नसल्याने वस्त्रांतरगृह नावालाच उरले असून, याचा वापर अन्य कारणांसाठीच होत आहे.
याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने इमारत बांधूनही महिलांना अद्यापही उघड्यावर कपडे बदलण्याची नामुष्की ओढवली आहे. (absence of changing room women have to change their clothes in open area nashik news)
प्राचीन रामतीर्थाचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने भाविकांचा वर्षभर राबता असतो. सध्या अखेरच्या टप्प्यात आलेला अधिक श्रावण मास सुरू असल्याने पहाटेपासून स्नानासाठी व वाण देण्यासाठी गर्दी उसळत आहे. स्नानानंतर वस्त्र बदलण्यासाठी जागा नसल्याने महिला तात्पुरता आडोसा करून वस्त्रे बदलतात.
वस्त्रांतरगृहाच्या खाली मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी सुरू असतात. त्यामुळे पाय ठेवायलाही जागा नसते. उघड्यावर कपडे बदलताना वखवखल्या नजरा टाळत महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. वस्त्रांतरगृहाच्या पहिल्या मजल्यावर गंगा गोदावरी पुरोहित संघाचे कार्यालय आहे, तर उर्वरित जागेत अन्य विधी सुरू असतात.
त्यावरील मजल्याचा ताबा पोलिसांकडे असून, कुंभमेळ्यात येथूनच कायदा सुव्यवस्थेचे नियोजन केले जाते. वस्त्रांतरगृहाची इमारत बांधण्यापूर्वी दगडी इमारतीत वस्त्रे बदलण्याची सोय होती. नवी इमारत बांधताना ते पाडून टाकण्यात आले. सध्या महिलांना तात्पुरता आडोसा उभा करून कपडे बदलावे लागत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
वस्त्रांतरगृहाचा वाद जुनाच
महिलांना कपडे बदलण्यासाठी या वस्त्रांतरगृहाची निर्मिती सिंहस्थ कुंभमेळ्यात करण्यात आली. सुरवातीपासूनच या जागेचा वस्त्रांतरगृह म्हणून वापर झाला नाही. त्यातच काही हिंदुत्ववादी संघटनांनी वस्त्रांतरगृहामुळे रामतीर्थात सूर्याची पहिली किरणे पडत नसल्याने ते पाडून टाकण्याची मागणी केली. या मागणीने अधूनमधून डोके वर काढल्यावर पुन्हा वस्त्रांतरगृह पाडण्याची चर्चा सुरू होते. ही चर्चा हे वस्त्रांतरगृह बांधण्यापासूनच सुरू आहे.
गोदेला गटारीचे स्वरूप
सध्या पावसाळा सुरू असून धरणातही चांगला पाणीसाठा आहे. पाऊस थांबल्याने पाण्याचा विसर्गही थांबला आहे. त्यामुळे भाविकांना पात्रातील काळसर पाण्यातच स्नान उरकावे लागत आहे. पाण्याची अवस्था बघून अनेक महिला स्नानाएवजी केवळ हातपाय धुण्यास पसंती देत आहेत.
"गंगा गोदावरीचे धार्मिक महत्त्व मोठे असल्याने वर्षभर गर्दी असते. परंतु रामतीर्थावर वस्त्रांतरगृहासह स्वच्छतागृह नसल्याने महिलांची मोठी अडचण होते." - सरला वराडे, भाविक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.