नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी (NMC election) अंतिम मतदारयाद्या (Voter List) प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर हरकतींचा गोषवारा समोर येत आहे. यात प्राप्त एकूण हरकतींपैकी ८३४ हरकती निरर्थक असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला असून, स्वीकारण्यात आलेल्या एकूण हरकतींपैकी दोन हजार ८७७ हरकती पूर्णपणे मान्य करत त्यात दुरुस्ती करण्यात आली. (Abstract of objections to draft voter list NMC elections Latest Marathi news)
आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. नाशिक महापालिकेसाठी वाढीव लोकसंख्येनुसार ४४ प्रभाग तयार करण्यात आले.
तीन सदस्यांचे ४३, तर चार सदस्यांचा एक प्रभाग आहे. अंतिम प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी २३ जूनला जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली. प्रारूप मतदारयादीवर तब्बल तीन हजार ८४७ हरकती दाखल झाल्या. महापालिकेच्या इतिहासात सर्वाधिक हरकतींची नोंद यंदा घेण्यात आली.
हरकतींची वाढती संख्या लक्षात घेऊन स्थळपाहणी, पंचनामा करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या होत्या. २१ जुलैला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यात महापालिका निवडणुकीसाठी १२ लाख ३७२ मतदार निश्चित करण्यात आले.
तीन हजार ८४७ हरकतींपैकी ८३४ हरकती निरर्थक असल्याचा निष्कर्ष काढत त्या फेटाळण्यात आल्या. दोन हजार ८७७ हरकतींवर मात्र दुरुस्ती करण्यात आली. १३६ हरकती अंशतः स्वीकृत करत मतदार यादीत दुरुस्ती करण्यात आली.
सिडकोत सर्वाधिक निरर्थक हरकती
८३४ हरकती निरर्थक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्यातही सिडको विभागातल्या सर्वाधिक हरकती फेटाळण्यात आल्या. विशेष म्हणजे याच विभागातून सर्वाधिक दोन हजार ६३० हरकती प्राप्त झाल्या होत्या. सिडकोतील एकूण हरकतींपैकी २००७ हरकती पूर्णता, तर वीस हरकती अंशतः स्वीकृत करण्यात आल्या. ६०३ हरकती सिडको विभागातून फेटाळण्यात आल्या. पश्चिम विभागात ५२ हरकतींपैकी २३ पूर्ण, तर अकरा अंशतः स्वीकृत करण्यात आल्या. अठरा हरकती फेटाळल्या. पूर्व विभागात ३२५ पैकी २२१ पूर्णतः स्वीकारण्यात आल्या. ५६ अंशतः स्वीकृत करण्यात आल्या,तर ४८ हरकती फेटाळल्या. पंचवटी विभागात ४१८ हरकतींपैकी ३२० पूर्णता स्वीकारण्यात आल्या. २२ अंशतः स्वीकृत करण्यात आल्या तर ७६ हरकती फेटाळल्या. सातपूर विभागात एक हजार ६६६ पैकी १११ हरकती पूर्णता स्वीकारल्या गेल्या तर २७ अंशतः स्वीकृत केल्या. २८ हरकती फेटाळल्या. नाशिक रोड विभागात अडीचशे पैकी १९५ पूर्णतः स्वीकारण्यात आल्या तर २२ अंशतः स्वीकृत करण्यात आल्या व ३३ हरकती फेटाळल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.