esakal
नाशिक

Nashik Crime: प्रसूतीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन; सातपूरच्या मायको हॉस्पिटलमधील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : रात्री साडेबाराच्या सुमारास एक गर्भवती सातपूरच्या मायको हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली. या महिलेला कक्षात नेण्यात आले. मात्र तिला मानसिक आधार देण्याऐवजी तिच्यासोबत गैरवर्तन करण्यात आले.

संबंधित महिलेला जातिवाचक शिवीगाळ करत तिचे गाल, केस ओढून तिच्याबद्दल गैरशब्द वापरण्यात आले. रुग्णालयातील कर्मचारी महिलेकडून मिळालेल्या वागणुकीने घाबरलेल्या महिलेने मला विष आणून द्या, असं म्हणत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

या प्रकाराने खळबळ उडाली आहे. दरम्यान, ‘सकाळ’ने या हॉस्पिटलमधील यापूर्वीही घडलेल्या अशा प्रकाराबाबत आवाज उठविला होता. (Abuse of woman came for delivery in Myco Hospital Satpur Nashik Crime)

महापालिकेने सुमारे पाच कोटी रुपये खर्च करून सातपूर औद्योगिक परिसरात मायको हॉस्पिटलची उभारणी केली. प्रसूतिगृह असलेल्या या हॉस्पिटलमध्ये गरोदर महिलांची तपासणी तसेच बाळंतपण आणि कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात.

सर्वसामान्य कुटुंबातील अनेक महिला या ठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र मायको हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांमुळे सध्या हॉस्पिटलची नाचक्की होत आहे.

गुरुवारी (ता. ८) रात्री प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेच्याबाबतीत रुग्णालयात घडलेला प्रकार हा अतिशय लाजिरवाणा, संतापजनक आहे. याबबात कामगारवर्गात संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालयात येणाऱ्या महिलांशी तसेच त्यांच्या नातेवाइकांबरोबर गैरवर्तणूक केल्याच्या अनेक तक्रारी आजवर झालेल्या आहेत. संबंधित महिलेबरोबर घडलेला हा सर्व प्रकार महिलेची मानसिकता खालावणारा आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मायको हॉस्पिटलमधील काही उद्धट, अरेरावी करणारे तसेच रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाइकांशी गैरवर्तवणूक करणाऱ्या या कर्मचाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

एकीकडे सरकार जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी वेगवेगळ्या मोहिमा राबविते, मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक प्रशासनाला विचार करायला लावणारी आहे.

"मायको रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित महिला कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे. घटनेचा चौकशी अहवाल तयार करून वरिष्ठांकडे सोपविण्यात येईल, त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येइल."

- डॉ. रुचिता पावस्कर, वैद्यकीय अधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT