jailed esakal
नाशिक

Nashik Bribe Crime: खरेंच्या ‘लुटमारी’ची एसीबी करणार सखोल चौकशी; 3 दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Bribe Crime : जिल्ह्याच्या केंद्रभागी असलेल्या सहकार क्षेत्राशी संबंधित जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने १९ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

खरे यांच्या अटकेने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये फटाके वाजवून दिवाळी साजरी करण्यात आली तर, त्यांच्या कारकिर्दीतील आर्थिक गैरव्यवहारांची सखोल चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू झाली आहे.

दरम्यान, आजमितीस खरेंच्या राहत्या घरातून ५४ तोळे सोने, १६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली असून, सटाण्यातील त्यांच्या मूळ घरावरही पथकाने छापा टाकून झडती घेतली.

तसेच, ‘लाचलुचपत’च्या पाच पथकांकडून खरेंच्या मालमत्तेविषयी सखोल चौकशी सुरू असून, अनेक ठिकाणी त्यांनी प्लॉट खरेदी केल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे. (ACB will conduct thorough investigation into Khare robbery 3 days police custody Nashik Bribe Crime news)

जिल्ह्यात नुकत्याच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. यातील एका निवडणुकीत संचालकपदी निवडणूक आलेल्या तक्रारदाराविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करण्यात आली.

त्यासंदर्भात सुनावणीमध्ये तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७, रा. आई हाईटस्‌, कॉलेज रोड, नाशिक) यांनी खासगी इसम व ॲड. शैलेश सभद्रा (रा. उर्वी अपार्टमेंट, सौभाग्यनगर, गंगापूर रोड) यांच्यामार्फत ३० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, पथकाने सापळा रचला. खरे याने तक्रारदारास लाचेची ३० लाखांची रक्कम घेऊन कॉलेज रोडवरील घरीच बोलाविले असता लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ दोघांना अटक केली.

जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी (ता.१६) हजर केले असता सात दिवसांच्या कोठडीची मागणी तपास पथकाने केली.

न्यायालयाने खरे यांना १९ तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर ॲड. सभद्रा यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील हे तपास करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुसऱ्या दिवशीही झडतीसत्र सुरू

सोमवारी (ता.१५) रात्री कारवाई झाल्यानंतर खरे यांना अटक करून मुख्यालयात नेण्यात आले. तर अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या पथकाने खरे यांच्या कॉलेज रोडवरील घरात झडतीसत्र राबविण्यात आले.

यावेळी पथकाच्या हाती ५४ तोळे सोने आणि १६ लाख रुपयांची रोकड असे घबाड लागले. त्यांचा मोबाईलही जप्त करण्यात आला असून, त्यातील डाटातून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, त्यांच्या बँकखात्याची चौकशीही दुसऱ्या पथकामार्फत सुरू करण्यात आली. मंगळवारी (ता. १६) दिवसभर त्यांच्या घरात झडतीसत्र सुरू होते.

तसेच खरे यांच्या मूळगावी सटाणा येथील वडिलोपार्जित घरावरही छापा टाकून झडती घेण्यात आली. पथकांच्या हाती खरे यांनी जमविलेल्या ‘माया’चा शोध घेताना मोठ्याप्रमाणात खरेदी केलेल्या प्लॉटस्‌चे दस्तऐवज हाती लागल्याचे समजते.

तसेच, बँक लॉकर्सचीही माहिती घेतली जात असून, त्यातूनही मोठ्याप्रमाणात मालमत्ता हाती लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मुजोरपणा कायम

उपनिबंधक कार्यालयात मुजोर आणि उर्मट अधिकारी अशीच सतीश खरे यांची ख्याती होती. ‘लाचलुचपत’च्या कारवाईवेळी अनेक अधिकारी हतबल होतात.

.खरे मात्र कारवाईवेळीही ‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांसमवेत उर्मटरित्यानेच वावरत असल्याचे समजते. अवघ्या पाच महिन्यांनी ते सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्यापूर्वीच ते ‘लाचलुचपत’च्या सापळ्यात अडकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT