Dead Sadhvi in ​​the second photo Accident vehicles in Kasara Ghat esakal
नाशिक

Nashik Accident News : मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटात अपघात; 2 साध्वींचा दुर्दैवी मृत्यू

पोपट गवांदे

Nashik Accident News : मुंबई नाशिक महामार्गांवरील कसारा घाटातील लतिफवाडी जवळील ऑरेंज सिटीसमोर गुरुवार ( ता.८ रोजी ) पहाटे साडेपाचच्या सुमारास एका भरधाव वेगाने नाशिककडे जाणाऱ्या कंटेनरने पायी प्रवास करणाऱ्या दोन सांध्वीना धडक दिल्याने या भीषण अपघातात दोन साध्वीचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Accident at Kasara Ghat on Mumbai Nashik Highway 2 jain Sandhvi unfortunate death Nashik)

शहापूर मानस मंदिर येथून नाशिक येथील पवननगर स्थानकात चार महीन्याच्या चतुर्माससाठी पायी प्रवास करणाऱ्या प. पू. सिद्धायिकाश्रीजी, वय ३४ व प. पू. हर्षायीकाश्रीजी, वय ३० या दोन सांध्वी पायी प्रवास करीत होत्या.

याच दरम्यान एक कटेनर क्रमांक एम. एच. 40 ए. के. 9577 हा भरधावं वेगात नाशिककडे जात असता कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर चालकाने पिकअपला धडक दिली.

पिकअपने पायी यात्रेकरूंच्या सोबत असलेल्या ओमनी वाहनास मागून जोरदार धडक दिली. हे ओमनी वाहन पुढे पायी जात असलेल्या दोन्ही सांध्वीवर जाऊन आदळले. या झालेल्या भीषण अपघातात कंटेनरच्या चाकाखाली येऊन दोन्ही सांध्वीचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थली धावं घेऊन घोटी टोलनाका प्रशासनाच्या 1033 या रुग्णवाहिकेतून मृतदेह कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात रवाना केले.

दरम्यान अपघात करून जाणारा कंटेनर चालक कंटेनर टाकून पळून गेला असून पुढील तपास कसारा पोलीस करीत आहेत. श्रमण संघीय सलाहकार श्री सुमतिप्रकाशजी म. सा. वाचनाचार्य प्रवर श्री विशाल मुनिजी म. सा. यांच्या या दोन्ही साध्वी सुशिष्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच शहापूर, इगतपुरी, घोटी, नाशिक भागातील जैन बांधवांनी कसारा प्राथमिक रुग्णालयात गर्दी केली होती .

कसारा घाटात १० दिवसात ३ मयत ...

आज पहाटे झालेल्या अपघात ठिकाणी दहा दिवसापूर्वी पण एक पायी जाणाऱ्या इसमास उडवले होते त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता.मुंबई नाशिक लेनवर कसारा घाटात १० दिवसात दोन अपघात होऊन ३ जनांचा मृत्यु झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Tingare : पुण्यात चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला; वडगावशेरीत घडली घटना

Latest Marathi News Updates : पैसे वाटपाच्या आरोपांवर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण

...म्हणून 'हम साथ साथ है' मध्ये माधुरी दीक्षितला घेतलं नाही; म्हणते- मी चित्रपटाला नकार दिलाच नव्हता

Vinod Tawde : अन् विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच गाडीतून हॉटेलमधून पडले बाहेर, कारण काय?

IND vs AUS : भारताचे आघाडीचे ६ फलंदाज ठरले? एका फोटोने पर्थ कसोटीसाठीची स्ट्रॅटजी केली उघड

SCROLL FOR NEXT