Murder esakal
नाशिक

Nashik Crime News : प्रेयसीच्या खूनप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपीला मुख्य जिल्हा न्यायधीशांनी मरेपर्यंत जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परप्रांतिय प्रेयसीसमवेत सिन्नरमध्ये राहत असताना, तिच्या चारित्र्यावर संशय घेत गळा आवळून खून केल्याप्रकरणातील आरोपीला मुख्य जिल्हा न्यायधीशांनी मरेपर्यंत जन्मठेप व १० हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

२०१९ मध्ये सदरची घटना सिन्नर शहरात घडली होती. (Accused in girlfriend murder case sentenced to life imprisonment Nashik Crime News)

दरवेश गेंदालाल चौरे (४०, मूळ रा. भोपाळ) असे आरोपीचे नाव आहे. सिन्नर पोलीसात दाखल फिर्यादीनुसार, रेखा मेहरा (रा. भोपाळ) हिच्याशी आरोपी दरवेश याचे प्रेमसंबंध होते. रेखा विवाहित व तिला एक मुलगी रिया होती.

दोघींना घेऊन तो सिन्नरमध्ये राहण्यास आला होता. संजीवनी नगरमध्ये भाड्याच्या खोलीत ते राहत होते. मात्र दरवेश हा रेखाच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यातून त्यांच्या सतत वाद व्हायचे.

२१ सप्टेंबर २०१९ रोजी आरोपी दरवेश याने झालेल्या वादातून रेखाचा ओढणीने आवळून तिचा खून केला. त्यानंतर घराला कुलूप लावून पसार झाला होता. मुलगी रिया शाळेत आली असता तिने आईचा शोध घेतला पण ती मिळून आली नाही.

त्यामुळे पोलिसांना बोलावून दरवाजा उघडला असता, रेखा बाथरुममध्ये मृत आढळून आली. याप्रकरणी सिन्नर पोलिसात दरवेशविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालिन पोलीस निरीक्षक एस.पी. पाटील, उपनिरीक्षक सुदाम एखंडे यांनी केला आणि दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायधीश एस.डी. जगमलानी यांच्यासमोर चालला.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. शिरिष कडवे यांनी १८ साक्षीदार तपासले. आरोपीविरोधात दोषसिद्ध झाल्याने न्या. जगमलानी यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT