Nashik ZP News  esakal
नाशिक

Nashik: बांधकाम 3च्या कार्यकारी अभियंता यांच्यावर कारवाईचा बडगा; ZP अतिरिक्त CEO यांच्याकडून अहवाल सादर

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या कामकाजाबाबत तक्रारी असतानाच गत सहा महिन्यांपासून तब्बल २४ कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण होऊनही कार्यारंभ आदेश दिले नसल्याचे समोर आले होते.

त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागाच्या झाडाझडतीदेखील घेतल्या होत्या. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर अहवाल तयार करत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे सादर केला आहे.

त्यामुळे मित्तल आता त्यावर काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. (Action against Executive Engineer of Construction 3 Report submitted by ZP Additional CEO Nashik)

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या कार्यपद्धतीबाबत ठेकेदारांसह विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यांच्या आमदारांनी मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

वाढत्या तक्रारींवर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांनी बांधकाम विभागाच्या तीनही कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून त्यांनी या आर्थिक वर्षात राबविलेल्या निविदाप्रक्रिया व त्याबाबत पुढे केलेली कार्यवाही याची माहिती मागितली होती.

त्यानंतर दोनच दिवसांनी त्यांनी बांधकाम विभाग तीनमध्ये जाऊन अचानकपणे तपासणी केली. त्यांना तपासणीत कार्यकारी अभियंत्यांच्या कपाटात अंगणवाडी व शाळेच्या मार्चमध्ये मंजुरी दिलेल्या व फक्त कार्यारंभ आदेश देण्यावाचून पडून असलेल्या २४ फायली सापडल्या.

याबाबत कार्यकारी अभियंता नलावडे समाधानकारक उत्तर न देऊ शकल्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गुंडे यांनी त्या सर्व फायली ताब्यात घेतल्या होत्या. गुंडे यांनी याबाबतचा, तसेच तक्रारींच्या अनुषंगाने अहवाल तयार केला.

तयार केलेला अहवाल गुंडे यांनी मित्तल यांना सादर केला आहे. कार्यकारी अभियंत्यांनी केवळ ठेकेदार भेटण्यास येण्याची वाट पाहण्यात सहा महिने घालवले व कार्यारंभ आदेश दिले नसल्याची चर्चा आहे.

कार्यकारी अभियंता यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी झाल्या. आमदारांनीही तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे अहवालात काय दडलंय, याकडे लक्ष लागले आहे.

"जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग तीनबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तपासणी केली होती. त्याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत लवकर योग्य ती कारवाई करण्यात येईल."- आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय देरकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT