सिडको (जि. नाशिक) : सिडको परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून उत्तमनगर महाविद्यालया परिसर, पवननगर, शिवाजी चौक, पाथर्डी फाटा व विविध परिसरांमध्ये दुचाकी वाहनांच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज येत असतो. फटाका फुटल्यासारखा आवाज काढत असलेल्या वाहनांवर अंबड पोलिसांची करडी नजर असून, अशी वाहने रस्त्याने धावताना दिसल्यास त्या त्वरित जप्ती करण्याचे आदेश अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या वतीने देण्यात आले आहे. (Action against loud silencer bike drivers Nashik News)
अंबड पोलिसांनी सुरू केलेल्या या मोहिमेदरम्यान आतापर्यंत दहा वाहने जप्त केली असून, या वाहनांचे पूर्वीचे सायलेन्सर काढून नव्याने जोरात आवाज करणारे सायलेन्सर बसविण्यात आले आहे. या सायलेन्सरची किंमत हजारो रुपयांमध्ये असून, फक्त आपल्याकडे लक्ष कसे वेधले जाईल या अनुषंगाने ही सायलेन्सर बसविली जात असल्याचे वास्तववादी चित्र समोर येत आहे.
अशा आवाजाचा दुष्परिणाम लहान मुले, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर होत असतो. अंबड पोलिसांनी सुरू केलेल्या या कार्यवाहीचे सिडकोवासीयांनी स्वागत केले आहे. या वाहनांबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करत विनापरवानगी गाडीमध्ये बदल केल्याप्रकरणी कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार असल्याचे अंबड पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.