NMC News  esakal
नाशिक

NMC Drainage Cleaning : बेसमेंटला पाणी साठून दुर्घटना घडल्यास कारवाई!

विकासक, स्ट्रक्चरल इंजिनिअर, आर्किटेक्टला खबरदारीची सूचना

सकाळ वृत्तसेवा

NMC Drainage Cleaning : महापालिकेकडून पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून धोकादायक वाडे व इमारतींना नोटीस बजावताना पावसाळी गटारी व चेंबर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून इमारतींच्या तळघरात पाणी साठते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्या पार्श्वभूमीवर नगर रचना विभागाकडून बांधकाम व्यवसायिकांच्या नरेडको व क्रेडाई या संस्थांना महापालिकेने पत्र पाठवून बांधकाम व्यवसायिकांना तशा प्रकारच्या सूचना देण्याचे पत्रात म्हटले आहे.

त्याचबरोबर तळघरात किंवा बेसमेंटला पाणी साठून दुर्घटना घडल्यास संबंधित विकासक, आर्किटेक्ट व स्ट्रक्चर इंजिनिअर यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Action if accident occurs due to water accumulation in basement Cautionary Notice to Developer Structural Engineers Architects nashik)

महापालिकेकडून सध्या पावसाळापूर्व कामांनी वेग घेतला आहे. जूनच्या मध्यावर पाऊस पडेल. त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणात चेंबरची साफसफाई करण्यात आली आहे. पावसाळी गटारीचे स्वच्छता, तसेच ड्रेनेजलाइन स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.

जुने नाशिक, पंचवटी व इतर गावठाण भागात मोठ्या प्रमाणात पडके वाडे व जीर्ण झालेल्या इमारती आहे. या इमारतींच्या मालक व भाडेकरूंनादेखील महापालिकेने नोटिसा पाठवून धोकादायक भाग तातडीने उतरवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आता महापालिकेच्या नगररचना विभागाने दर वर्षाचा अनुभव लक्षात घेता नवीन इमारतींमधील तळघर तसेच बेसमेंटमध्ये पाणी साचून दुर्घटना घडण्याचे प्रकार घडतात व दूषित पाण्यामुळे रोग राहिला निमंत्रण मिळते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे महापालिकेचा नगररचना विभागाने तळघर व बेसमेंटमध्ये पाणी साचून दुर्घटना घडल्यास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विकासक, स्ट्रक्चरल इंजिनिअर, आर्किटेक्ट यांना जबाबदार धरून त्यांच्यावरदेखील कारवाई केली जाणार आहे.

या संदर्भात बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनांना देखील पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम 45 व 69 अन्वये बांधकाम परवानगी देताना आवश्यक सुरक्षा व जबाबदारी संदर्भात अधिक क्रमांक 10, 13, 20, 21 ते 30 यानुसार दक्षता घ्यावी असे अभिप्रेत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

"शहरात मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या असून, त्याच्या पायासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर तयार बेसमेंटमध्ये पाणी साचून दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी अन्यथा विकासक, आर्किटेक्ट स्ट्रक्चरल इंजिनिअर यांच्यावर कारवाई केली जाणार आहे"

- संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता, नगर रचना विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT