Delegation meeting with Pawar, Bhujbal, Patil esakal
नाशिक

Savitribai Phule Controversy: आक्षेपार्ह्य लेखनाची चौकशी करून होईल कारवाई; मुंबई पोलिस आयुक्तांची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य लिखाण करणाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून कडक कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही आज मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ आणि ‘हिंदू पोस्ट’ संकेतस्थळावर बंदी आणून लेखकांवर आणि संबंधितावर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने श्री. फणसाळकर यांची भेट घेऊन केली. (Action will be taken after investigating offensive writings about Savitribai Phule Testimony of Mumbai Police Commissioner Delegation meeting Pawar Bhujbal Patil Nashik News)

दरम्यान, मुंबई पोलिस आयुक्तालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे घटनेचा निषेध आंदोलनाद्वारे नोंदवण्यात आला.

यावेळी श्री. पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, बापूसाहेब भुजबळ, सदानंद मंडलीक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, सुनीता शिंदे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, नरेंद्र राणे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, महिलाध्यक्षा सुरेखा पेडणेकर, विभागीय युवक अध्यक्ष नीलेश भोसले, सुनील शिंदे, सोहेल सुभेदार, महेंद्र पानसरे, संजय तटकरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अन्यथा तीव्र आंदोलन

सावित्रीबाई फुलेंची बदनामी करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री. भुजबळ यांनी दिला. तसेच महापुरुषांवर गरळ ओकणाऱ्यांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे, असे श्री. पवार यांनी सांगितले.

मुंबई पोलिस आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की ‘इंडिक टेल्स' आणि ‘हिंदू पोस्ट' या मनुवादी वृत्ती असलेल्या संकेतस्थळावर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्यात आले आहे.

शरयू फौंडेशन ट्रस्ट नावाची संस्था ही ‘इंडिक टेल्स' हे संकेतस्थळ चालवते. ‘सावित्रीबाई फुलेंची शाळा म्हणजे ब्रिटिश सैनिकांना मुली पुरविण्याची सोय’ अशी मांडणी या संकेतस्थळावरील लेखामध्ये करण्यात आली.

सावित्रीबाई फुलेंच्या कामाबद्दल ‘इंडिक टेल्स’ च्या लेखात अपमानजनक भाषेचा वापर करण्यात आला. हे वेदनादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार संतापजनक आणि घाणेरडा असून त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील मुद्दे

० ‘इंडिक टेल्स' या संकेतस्थळावरील लेख ‘मुखरनीना’ या नावाखाली नीना मुखर्जी यांनी पोस्ट केल्याचे दिसून येत आहे. लेखाचे क्रेडीट हे ‘Bhardwajspeeks‘ या भारद्वाज नावाच्या व्यक्तीस दिले गेले.

या व्यक्तीच्या ट्विटर अकौंटवरून थ्रेडस (लेख) रूपात या संकेतस्थळावर पोस्ट केल्या गेल्या आहेत. भारद्वाज नावाच्या व्यक्तीचे ट्विटरः थ्रेड्स तपासले असता, सदर व्यक्तीने महात्मा गांधींपासून ते इतर अनेक महनीय व्यक्तींविरुद्ध आक्षेपार्ह्य व एककल्ली लिखाण केले असल्याचे दिसून येते.

तसेच सर्व संबंधित लोकांचे आणि संस्थेचे ‘प्रोफाईल’ सुद्धा पत्रासोबत जोडण्यात आले आहे. मुंबई पोलिस आयुक्तांच्या निवेदनात ही बाब समाविष्ट आहे.

सदर कृत्य हे समाजातील महापुरुषांचा उद्देशपूर्वक अपमान करून त्यायोगे कोणत्याही व्यक्तीला प्रक्षोभित करेल असे आहे. अशा प्रक्षोभनामुळे सार्वजनिक शांततेचा भंग व्हावा, अथवा अन्य कोणताही अपराध घडावा असा त्यामागे त्याचा उद्देश आहे.

तसेच विविध जाती अथवा समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची अथवा द्वेषाची भावना, अथवा दृष्टावा निर्माण व्हावा असा उद्देश आणि कृत्य हे संबंधितानी केले आहे.

त्यामुळे हा विषय सरकारने गांभीर्याने घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या ‘इंडिक टेल्स’, ‘हिंदू पोस्ट’, श्री. भारद्वाज, नीना मुखर्जी यांच्यावर व अशा समाजविघातक संकेतस्थळावर बंदी आणावी. फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे मुंबई पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT