नाशिक : महापालिकेच्या (NMC) उत्पन्नात प्रमुख स्रोत असलेल्या घरपट्टीतून (Property tax) गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे (Corona) परिणामकारक वसुली झाली नाही. मात्र, यंदा जाहीर करण्यात आलेल्या सवलत योजनेतून महापालिकेच्या तिजोरीत अतिरिक्त ४४ कोटी रुपयांचा महसूल (Revenue) जमा झाला आहे.
विशेष म्हणजे एक लाख ९० हजार ३४ घरपट्टी धारकांनी योजनेचा लाभ घेतला. (Additional revenue of Rs 44 crore in NMC treasury NMC latest marathi news)
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नागरिकांचा प्रतिसाद मिळावा म्हणून महापालिकेकडून अनेकदा आवाहन केले. परंतु, प्रतिसाद मिळत नसल्याने गुणांकन कमी होऊन स्वच्छ भारत अभियानात नाशिकचा क्रमांक सातत्याने खालावत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, घरपट्टी धारकांसाठी महापालिकेने सवलत योजना जाहीर केली आहे. योजनेअंतर्गत आर्थिक वर्षाच्या पहिल्या म्हणजे एप्रिल महिन्यात आगाऊ घरपट्टी अदा केल्यास पाच टक्के, मे महिन्यात तीन टक्के, तर जून महिन्यात दोन टक्के घरपट्टी सवलत योजना आहे.
इ- पेमेंटद्वारे भरणा केल्यास अतिरिक्त एक टक्का व अधिकाधिक १००० रुपयांपर्यंतच्या सवलतीचा समावेश आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यात तब्बल एक लाख ९० हजार ३४ मिळकत धारकांनी योजनेचा लाभ घेत असाही प्रतिसाद नोंदविला. सवलत योजनेच्या प्रतिसादातून तीन महिन्यात ७१ कोटी ४२ लाख रुपये महसूल मिळाला आहे.
सवलत योजनेतून विक्रमी वसुली
सात वर्षांपासून योजना सुरू आहे. या वर्षी विक्रमी वसुली झाली. एप्रिल महिन्यात पाच टक्के सवलत देण्यात आली, त्यातून २७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
मे महिन्यात तीन टक्के सवलत देण्यात आली, त्यातून २६ कोटी रुपये तर जून महिन्यात दोन टक्के सवलत देण्यात आली. त्यातून १९ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. या कर सवलत योजनेतून महापालिकेने आतापर्यंत एक कोटी ६६ लाख मिळकत धारकांना रिबेट दिल्याची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.