adgaon village and youth along with women took out candle march for maratha reservation nashik news 
नाशिक

Maratha Reservation : सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको; पोलिसांचा आंदोलकांवर ‘वॉच’

सकाळ वृत्तसेवा

Maratha Reservation : आडगाव सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल कँडल मार्च काढण्यात आला. त्यानंतर समस्त मराठा समाजाच्या विशेषतः महिलांच्या सर्वांच्या भावनांचा उद्रेक होऊन रास्ता रोको करण्याचा आग्रह धरल्याने मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगावच्या जुना जकात नाका या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.

राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे-पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आडगाव शिवारात मंगळवारी (ता. ३१) आडगाव ग्रामस्थ व महिलांसह तरुणींनी कँडल मार्च काढण्यात आला. (adgaon village and youth along with women took out candle march for maratha reservation nashik news)

सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केला होता. या वेळी रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. सकल मराठा समाजातर्फे म्हसरूळ येथील ग्रामस्थ बैठक घेत पुढील नियोजन करणार आहेत. तसेच मखमलाबाद गावातील सकल मराठा समाजाकडून दोन दिवसात बैठक घेत कँडल मार्च व साखळी उपोषण करणार आहेत.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभरात आंदोलनाला हिंसक वळण लागले असताना, त्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तातडीची बैठक घेत अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शहरभर कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, आंदोलकांवर गोपनीय शाखेकडून वॉच ठेवण्यात येणार आहे.

तसेच आंदोलनावर नियंत्रण मिळविण्यासाठी जादा कुमक व राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आली आहे. याशिवाय दंगानियंत्रण पथक, शिघ्रकृतीदलासह धुळे येथील प्रशिक्षण केंद्रातून जादा कुमकही शहरात पाचारण करण्यात आलेली आहे.
शहरात ठिकठिकाणी दिवसरात्र नाकाबंदी करून करडी नजर ठेवली जाणार आहे.

तसेच रात्रीची गस्ती वाढवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकडीसह यापूर्वी राजकीय दंगलीमध्ये गुन्हे दाखल असणाऱ्यांवरही पोलिस नजर ठेवून आहेत.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी तातडीची बैठक घेतली. बैठकीला गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोन उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, आयुक्तालय हद्दीतील १४ पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते.

ठाणेनिहाय कडेकोट बंदोबस्तासह ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणे, लोकप्रतिनिधींचे निवास व कार्यालयासह पक्ष कार्यालयांना बंदोबस्त यापूर्वीच तैनात आहे, त्याबाबत अधिकाऱ्यांनी सतत लक्ष ठेवणे, शहरात कुठेही आंदोलन हिंसक होणार नाही याची काळजी घेणे.

आंदोलक हिंसक होत असल्यास तत्काळ कारवाई करणे, ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावणे, यापूर्वीच्या राजकीय दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्यांच्या हालचालींवर नजर ठेवणे यासह शहरभर दिवस-रात्र गस्त वाढविण्याच्या सूचना आयुक्त शिंदे यांनी केल्या. ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT