Paper Dron esakal
नाशिक

Adhik Maas 2023: शहराच्या अर्थकारणास मिळतेय बळकटी! अधिक मासाच्या द्रोण विक्रीतून शेकडोंना रोजगार

दत्ता जाधव

Adhik Maas 2023 : अधिक श्रावण मासाचे आता अखेरचे दहा दिवस शिल्लक राहिले आहेत. या काळात पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी वीकेंडचे औचित्य साधत गोदाघाटावर गर्दी वाढली आहे.

दरम्यान, गत काही दिवसांपासून बाजारात तेजीचे वातावरण आहे. अधिक मासासाठी देवाला दान करायच्या द्रोणच्या निर्मितीसह विक्रीतून शेकडो जणांना तात्पुरत्या स्वरूपात का होईना रोजगार निर्माण झाल्याने शहराच्या अर्थकारणासही बळकटी मिळाली आहे. (Adhik Maas 2023 city economy getting boost Hundreds of jobs through patravali dron sales of more fish nashik)

अधिक श्रावण मासास गत महिन्याच्या १८ तारखेस प्रारंभ झाला असून, बुधवारी (ता. १६) समाप्ती होत आहे. देवाला वाण देण्यासाठी सद्या मोठी गर्दी उसळत आहे. त्यातच शनिवार, रविवारच्या सुट्यांचे औचित्य साधत कपालेश्‍वर, श्री काळाराम मंदिरात, तर भाविकांची अक्षरश रीघ लागली आहे.

गोदाघाटासह विविध मंदिरांजवळ शहराच्या विविध भागातून वाणविक्रेते मोठ्या प्रमाणावर दाखल झाले असून, यामुळे अनेक कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगार उपलब्ध झाला आहे.

वीस रुपयांपासून ‘वाण’

बाजारात वाणासाठी बत्तासे, म्हैसूर वडी, अनारसे असे पर्याय उपलब्ध असले तरी बहुतांशी महिलांची पसंती बत्ताशालाच आहे. बत्तासे तयार करणारे अनेक उद्योग शहर परिसरात कार्यरत आहेत. सद्या एकशेवीस ते एकशे चाळीस रुपये किलो दराने बत्तासे उपलब्ध आहेत.

वाणासाठी लागणारे द्रोण पंधरा ते वीस रुपये शेकडा, तर छोटे दिवे वीस ते तीस रुपये डझन दराने उपलब्ध आहेत. एका वाणात कापूस वात, पाच किंवा अकराच्या पटीतील बत्तासे, फुले व छोटी पणती असते. ते बाजारात वीस रुपयांपासून चाळीस रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बत्ताशांसाठी वेटिंग

साखरेपासून बत्तासे बनविणारे अनेक कारखाने शहर परिसरात सक्रिय आहेत. अधिक मासामुळे बत्ताशांच्या मागणीत मोठी वाढ झाल्यामुळे माल खरेदीसाठी अक्षरश वेटिंग असल्याचे विक्रेते सांगतात.

किलोभर बत्ताशांसाठी एकशेवीस रुपये मोजावे लागतात. मालाच्या तुटवड्यामुळे बत्ताशांचे उत्पादन दिवस-रात्र सुरू असल्याचे न्यू भारत प्रॉडक्टच्या संचालकांनी सांगितले.

"वाण विकण्यासाठी जुन्या सिडकोतून सकाळीच गोदाघाटावर पत्नीसह येतो. या विक्रीतून दोन पैसेही पदरात पडत असल्याचे समाधान व आनंद आहे."

- राजाभाऊ जोशी, जुने सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT