Adhik Maas 2023 : शनिवार, रविवार वीकेंडचे औचित्य साधत रामतीर्थावर स्नानासाठी व वाण देण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.
पावसाने उघडीप दिल्याने श्री काळाराम, कपालेश्वर महादेव आदी ठिकाणीही भाविकांमध्ये दर्शनासाठी मोठा उत्साह होता. (Adhik Maas 2023 Devotees Excited for Darshan second day temples full of devotees for bathing nashik)
अधिक श्रावण महिन्याचे पंधरा दिवस अद्याप शिल्लक आहेत. गत आठवड्यात पावसाच्या रिपरिपीने भाविकांत म्हणावा तसा उत्साह नव्हता. परंतु पावसाने उघडीप दिल्याने सलग सुट्यांचे औचित्य साधत आजही देवाला वाण देण्याबरोबरच रामतीर्थावर स्नानासाठी सकाळपासून मोठी गर्दी उसळली होती.
गत आठवड्यापर्यंत कोरडीठाक पडलेली गोदावरी विसर्गानंतर पुन्हा खळाळल्याने उत्साहात अधिक भर पडली.
दरम्यान, कालपासून राज्यासह परराज्यातील वाहने मोठ्या संख्येने गंगाघाटावर दाखल झाल्याने रामतीर्थ, देवीमंदिर भागात दिवसभर वाहतुकीची कोंडी अनुभवण्यास मिळाली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बाजारातही तेजी
अधिक मासामुळे सोन्या-चांदीच्या खरेदीनेही कोटीची उड्डाणे घेतल्याचे सराफ बाजारातील गर्दीवरून व्यावसायिकांनी अंदाज व्यक्त केला आहे. शनिवार, रविवारच्या सुटीमुळे मेन रोड, दहिपूल, वीर सावरकर पथ, गाडगे महाराज पुतळा, शालिमार आदी भागात खरेदीसाठी गर्दी उसळली होती.
बाहेरील वाहनधारकांना शहरातील गर्दीचा अंदाज नसल्याने अनेकांची वाहने गर्दीत अडकून पडली. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.
त्यातच मेन रोड, वीर सावरकर पथावरील अतिक्रमणांमुळे वाहतुकीचा पूर्णपणे फज्जा उडाला. दहिपुलावरील महावीर मिठाईसमोरील चौकात वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.