या देवी सर्वाभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।
रविवार पेठ येथील गाडगीळ गल्लीतील रेणुकामातेचे पुरातन मंदिर आहे. मंदिराला सुमारे १५० वर्षे झाली आहेत. चांदवडच्या देवीचे हुबेहुब रूप म्हणजे गाडगीळ गल्लीतील रेणुकामाता. (Adimaya Adishakti Renuka Mata in Sunday house Navratri 2022 Nashik Latest Marathi News)
आख्यायिका
रविवार पेठेतील गाडगीळ हे देवीचे निस्सीम भक्त होते. ते बहुतेकदा चांदवडच्या रेणुकामातेला जात असतं. नवरात्रात तर ते नेहमीच जात. कालांतराने वृद्धापकाळाने त्यांना चांदवडला जाणे शक्य होत नव्हते; मात्र सतत देवीची आराधना ते करत. त्यांनी देवीची प्रार्थना केली. ‘देवी मला तुझ्या दर्शनाची आस लागली आहे’. तेव्हा देवीने त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला, की तुझ्यासाठी मी तुझ्या वाड्यातच येईल.
फक्त तू माझ्या ध्यानात नितांत राहा. मात्र, त्यांनी उत्सुकतेने देवी खरच आली आहे का म्हणून बघितले असता, देवी तिथेच अंतर्धान पावली व चांदवडच्या देवीचे हुबेहुब रूपात मातेने वाड्यात वास केला. देवी नवसाला पावणारी म्हणून भक्तांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रात मंदिरात भक्तांची गर्दी होत असते. गाडगीळ देवीचे पूजारी म्हणून या गल्लीला गाडगीळ गल्लीतील रेणुकामाता असेही म्हणतात. गाडगीळ हे आपल्याच नात्यातील पटवर्धन यांच्या वाड्यात राहात होते.
तिथेच त्यांनी देवीची सेवा केली. त्यांच्या पश्चात यशवंत, गोविंद पटवर्धन यांनी देवीची सेवा केली. सध्या गोपाळ पटवर्धन यांची मुले व पुतण्या म्हणजेच चौथी पिढी देवीची सेवा करत आहेत. १९८२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तुषार, विवेश व योगेश पटवर्धन हे सद्यःस्थितीत देवीची सेवा करत आहेत. तसेच मंदिराचा कारभार सांभाळत आहे. अष्टमीला होमहवन केले जाते. मंदिरात भजनी मंडळांकडून भजनाचे कार्यक्रम होत असतात. कोजागरीला दुग्ध प्रसादाचे आयोजन करण्यात येते.
"रेणुकामाता जागृत स्थान आहे. बहुतेकवेळा आलेल्या अडचणीतून मातेने तारून नेले आहे. अगदी अलीकडच्या काळातील कोरोना वातावरणात माझ्या पत्नीला साक्षात सकारात्मक अनुभव आला आहे. आईची सतत आमच्यावर कृपा आहे." -तुषार पटवर्धन, पुजारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.