Aditi Tatkare esakal
नाशिक

Nashik Aditi Tatkare : अनाथांना योजनांचा 23 व्या वर्षांपर्यंत लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील : अदिती तटकरे

जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घघाटन

सकाळ वृत्तसेवा

Nashik Aditi Tatkare : बालकांच्या शालेय जीवनात अभ्यासासमवेत, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविले पाहिजे. ही संधी महिला व बालकल्याण विभागामार्फत बालकांना महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे.

शासनाकडून नवीन बालक धोरण तयार केले जात आहे. (Aditi Tatkare statement of Govt trying to provide benefits of schemes to orphans up to 23 years nashik news)

यात बालकांना १८ वर्षांपर्यंत योजनांचा मिळणारा लाभ २३ व्या वर्षांपर्यंत देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गुरुवारी केले. नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव २०२३-२४ चे उद्धघाटन गुरूवारी (ता.४) मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रताप पाटील, बाल हक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, माजी आमदार जयंत जाधव, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवती जिल्हाध्यक्ष किशोरी खैरनार यांच्यासह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी व बाल महोत्सवात सहभागी झालेले मुले व मुली उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की, महिला व बाल विकास विभागामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतच होत असते. या बाल महोत्सवाचा बालकांनी आनंद घ्यावा, असे त्यांनी सांगितले. बालकांमधील कलागुणांना संधी मिळण्यासाठी बाल महोत्सव व इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.

आजच्या तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या अतिवापरामुळे पालक व मुलांमधील संवाद कमी झाला आहे. कमी झालेला हा संवाद वाढविण्यासाठी विभागाच्यावतीने स्पर्धा, महोत्सव अशा विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुलांना लहानपणापासूनच अभ्यासासोबतच त्यांना आवड असणाऱ्या क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिल्यास, त्यांचा मानसिक व शारिरीक विकास होण्यास मदत होते.

या बाल महोत्सवाच्या माध्यमातून आनंद घेतांना मुलांना कोणतीही दुखापत होणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे सूचना मंत्री तटकरे यांनी यावेळी अधिकार्यांना दिल्या. उपायुक्त पगारे यांनी प्रास्तविकात बालमहोत्सवामागील संकप्लना विशद केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला पंडित जवाहरलाल नेहरू व सावित्रीबा़ई फुले यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.

त्यानंतर प्रातिनिधीक स्वरूपात अनाथ प्रमाणपत्र व माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुदत ठेव प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच बेटी बचाव, बेटी पढाव या दौड टी-शर्ट व टोपी लोगोचे अनावरण करण्यात आले. जिल्हा व बालविकास अधिकारी दुसाने यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT