नाशिक : चाळीस आमदारांसह स्वतंत्र गट निर्माण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी शिवसेनेलाच (Shiv sena) आव्हान दिल्यानंतर राज्यातील आपल्या गढ्या मजबूत आहे की नाही, याची चाचपणी करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मैदानात उतरले आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी (ता. २१) नाशिकमध्ये श्री. ठाकरे यांची शिवसंवाद यात्रेचे आगमन होणार आहे. या वेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू झाली आहे. (Aditya Thackeray coming to Nashik for shivsena gadi nashik Latest news)
राज्यात शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात नाशिकची भूमिका कायम महत्त्वाची राहिली आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर नाशिकमधून समता परिषदेची बांधणी केली. त्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेची दोन हात करताना जिल्ह्यातील दोन आमदार बरोबर घेतले होते.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्या वेळी नाशिकमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे शिवसेनेसाठी नाशिक हा राजकीय घडामोडींचे प्रमुख केंद्र आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे शिवसेनेच्या गढ्या मजबूत आहे की नाही, याची चाचणी करण्यासाठी मैदानात उतरले आहे.
शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेची सध्या अस्तित्वात असलेली ताकद ते आजमावून पाहत आहे. त्या अनुषंगाने आदित्य ठाकरे नाशिकच्या मैदानात उतरत आहे. २१ जुलैला ते नाशिकमध्ये येणार असून, यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदार दादा भुसे व सुहास कांदे यांच्या मतदारसंघातदेखील भेट देणार आहे. ‘आपला भगवा, आपली शिवसेना’, असा नारा आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेत दिला आहे
प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी
गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आदित्य ठाकरे नाशिकमध्ये येतील. याचवेळी पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुसऱ्या दिवशी निफाड, मनमाड, नांदगाव, दाभाडी, दिंडोरी, येवला असा दौरा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.