Youth leader Aditya Thackeray inspecting the drought area. Neighbor former MLA Anil Kadam.  esakal
नाशिक

Aditya Thackeray News : असंवेदनशील सरकारला जाब विचारणार : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

Aditya Thackeray News : दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही. पीकविमा कंपनी पिके वाया जाऊनही शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई देत नाही. सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही, तर कोणतेही पीक हातात येत नाही, हे प्रशासनाला माहिती आहे.

अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे. पीक पंचनामे अजूनही सुरू नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे.

या सरकारला शेतकऱ्यांबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले. (Aditya Thackeray statement about government nashik news)

निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थिती पाहणी करताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना ते बोलत होते. माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हाध्यक्ष विक्रम रंधवे, तालुकाध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे, भाऊसाहेब कमानकर, शरद खालकर, खंडू बोडके, शरद कुटे, अश्पाक शेख, दिलीप कदम, रामदास खालकर, श्याम खालकर यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

निफाड तालुक्यातील अनेक गावात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. विकत पाणी घेऊन पिकवलेली टोमॅटो, भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे.

शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पाहणी दौरा केला. निफाड तालुक्यातील दक्षिण भागातील भेंडाळी परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टोमॅटो आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पाहणी ठाकरे यांनी केली.

यावेळी फसवे कांदा अनुदान, फसवी कर्जमाफी, जिल्हा बँकेचे कर्जवाटप बंद, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, खरीप हंगाम गेला आता शेतकऱ्यांनी मुलांच शिक्षण कसे करावे, लग्न कसे करावे, कुटुंब कसे चालवावे, आरोग्याचा प्रश्न कसा सोडवावा, असा अनेक समस्यांचा पाढा आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला.

या वेळी ठाकरे म्हणाले, की हे घटनाबाह्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. लोकांची भीती यांना नाही. त्यामुळे ते बिनधास्त कुठे काही बोलतात. प्रत्येक घटकाला केवळ आश्वासन देतात. शेतकरी आर्थिक समस्यांमध्ये असताना अद्याप दुष्काळ परिस्थितीवर कोणतेही पाऊल सरकारने उचलले नाही; पण आम्ही सरकारला याचा जाब विचारू, अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT