Gangadharan D latest marathi news esakal
नाशिक

..तर पर्यटनस्थळांवर प्रतिबंध | Nashik

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील धरण आणि धबधब्यांवर पावसाळी पर्यटनासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. दुगारवाडी धबधब्यावर रविवारी (ता. ७) एकजण वाहून गेला.

कायम अधूनमधून अशा दुर्घटना घडत असल्याने प्रशासन धबधबे आणि धरणस्थळांवर पर्यटनासाठी प्रतिबंध आणण्याचा विचार करीत आहे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी ही माहीती दिली. (Administration consideration of ban on tourist places gangatharan D nashik latest marathi news)

जिल्ह्यात सर्वाधिक २३ ते २४ धरणे आणि पर्यटनस्थळे आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात यंदा चांगला पाउस झाला. जुलैत सरासरीपेक्षा २०० टक्के अधिक पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातही सरासरी आजच पूर्ण झाली आहे.

पुढील दोन-तीन दिवस जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशातच पुढील आठवड्यात सलग सुट्या असल्याने दोन वर्षे कोरोनामुळे पावसाळी पर्यटनाला मुकलेल्या नागरिकांची गर्दी उसळत असल्याचे वेळोवेळी पुढे येते आहे.

रविवारी अशाच घटनेतून दुगारवाडी धबधब्यावर एकजण वाहून गेला. २१ जणांना वाचविण्यात यश आले. रात्रभर प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी अंधारात विनारेंजच्या भागात कार्यरत होती. सातत्याने असे प्रकार पुढे येत असल्याने प्रशासनाने धरण आणि धबधबे या ठिकाणी प्रतिबंध आणण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. म्हणाले, की पर्यटनाला गर्दी होऊन अशा दुर्घटना वाढत राहिल्यास, प्रशासनाला नाइलाजाने जलस्रोत असलेल्या ठिकाणांवर पर्यटनासाठी बंदी आणण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनाचा आनंद जरूर लुटावा, पण स्वतःचा जीव धोक्यात जाईल एवढा आततायीपणा करू नये. क्षणभराच्या आनंदापेक्षा स्‍वतःचा जीव मौल्यवान आहे हे लक्षात घ्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT