Nashik News : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी व नंदिनी नदीच्या पात्रामध्ये ५० सांडपाण्याची नाले वाहत असून, त्या नाल्यांची पाहणी करण्यासाठीदेखील महापालिकेच्या यंत्रणेला वेळ नसल्याची बाब समोर आली आहे.
गोदावरी प्रदूषण उपसमिती बैठक सोमवारी (ता.३१) महापालिका मुख्यालयात पार पडली. बैठकीच्या निमित्ताने ही गंभीर बाब समोर आली आहे. (Administration does not get time to inspect drains Disclosures from Godavari Pollution Sub Committee meeting Nashik News)
मागील वर्षी उपसमिती सदस्य निशिकांत पगारे यांनी गोदावरीत मिसळणाऱ्या नाल्यांच्या संख्येबाबत माहिती विचारली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी गोदावरी व नंदिनी नदीचा दौरा केला.
त्या वेळी प्रशासनाला तातडीने नाल्यांसंदर्भात माहिती देण्याची सूचना केली. त्यानंतर गोदावरी संवर्धन कक्ष, तसेच बांधकाम व ड्रेनेज विभागाने माहिती दिली नाही. त्यानंतर डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीदेखील माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्यांच्या सूचनाही गुंडाळण्यात आल्या. पगारे यांनी अखेरीस माहितीच्या अधिकारात नाल्यांची माहिती मागितली. प्रशासनाकडून ५० नाल्यांची यादी देण्यात आली. परंतु नाल्यांची स्थळे व परिस्थिती जाणून घेण्यासंदर्भात अद्यापही स्थळांना भेट देण्याकडे प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याची बाब समोर आली आहे.
उपसमितीच्या सदस्यांना गोदावरी व नंदिनी नदी प्रदूषणसंदर्भात माहिती मिळत नसेल तर सर्वसामान्यांना प्रशासनाकडून अंधारात ठेवले जात असल्याचा आरोप पगारे यांनी केला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसमितीची बैठक झाली.
धरणातून होत असलेला पाण्याचा उपसा व प्रत्यक्षात निर्माण होणारे मलजल ऑडिट संदर्भात चर्चा झाली. गोदावरी नदीत मिसळणारे पाणी, सोमेश्वर परिसरामध्ये नदीच्या पाण्यावर आढळलेले केमिकलचे तवंग,
निळ्या पूररेषेतील अतिक्रमण हटविणे, प्लॅस्टिक बंदीच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, अमृत दोन योजनेअंतर्गत मल जलशुद्धीकरण प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासाठी शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा आढावा,
गोदावरी नदीपात्रातील विविध कुंडातील काँक्रिट काढण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचना यासंदर्भात चर्चा करण्यात आली. गोदावरी संवर्धन कक्षाचे डॉ. विजयकुमार मुंडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी,
स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, मलनिस्सारण विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, अतिक्रमण विभागाचे नितीन नेर, संजय अग्रवाल आदी बैठकीला उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी जनजागृती
जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी महापालिकेकडून रेनवॉटर हार्वेस्टिंग चळवळ राबवली जाणार आहे. घराच्या छतावर पडणारे पाणी जमिनीत जिरवणे हा प्रमुख उद्देश आहे.
यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था नाही, अशा मालमत्ताधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
ट्रॅश ट्रिमर मशिन धूळखात
नदीपात्रातील पानवेली काढण्यासाठी महापालिकेकडून जवळपास सहा कोटी रुपये खर्च करून ट्रॅश ट्रिमर मशिन खरेदी करण्यात आली आहे. सध्या नदीपात्रावर पानवेली साचल्या असताना मशिनचा वापर करणे आवश्यक आहे, मात्र भांडार विभागामध्ये सदर मशिन झाकून ठेवल्याने त्या मशिनचा उपयोग काय असावा पगारे यांनी केला.
दरम्यान पंचवटी अमरधाम येथील नदीपात्रात गॅबियन वॉल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. नंदिनी नदीवरील साहिल लॉन्सच्या बाजूलादेखील उर्वरित गॅबियन वॉलचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.