Nashik municipal corporation  esakal
नाशिक

‘माजी’ होताच लोकप्रतिनिधींची पाठ

शहरात समस्यांचा महापूर; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिकचा कालावधी १४ मार्चला संपुष्टात आल्यानंतर लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन प्रशासकीय राजवट लागू झाली. प्रशासकीय कामकाजावर लक्ष ठेवणे, सूचना देणारी यंत्रणाच नसल्याने प्रशासकीय यंत्रणा निर्ढावली असून त्याचा परिणाम शहरात समस्यांमध्ये वाढ होण्यात झाला आहे. बैठका, वाढते ऊन, बदल्या, पदोन्नत्या, दौरे, कोर्ट-कचेऱ्या या विषयाभोवतीच प्रशासकीय यंत्रणा फिरत असून, प्रशासन प्रमुखपदाच्या अदलाबदलीचाही काहीसा परिणाम दिसून येत आहे.

साधारण जानेवारीत महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक जाहीर होते. त्यामुळे पंचवार्षिकमधील शेवटच्या वर्षातील ऑक्टोबर महिन्यापासून नगरसेवक प्रचाराच्या कामाला लागता. यंदा ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या आहेत. त्यामुळे प्रचारात नगरसेवक रमले. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाकडे कोणाचे लक्ष नव्हते, आता तर १४ मार्चपासून नगरसेवकांवर ‘माजी’ शिक्का बसताना प्रशासनाच्या हाती सर्व सूत्रे आल्याने कामकाजाच्या पातळीवर परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. लोकप्रतिनिधी राजवटी पासून ते आतापर्यंतच्या पाच महिन्यांच्या कालावधीपर्यंत मुळ कर्तव्याकडे दुर्लक्ष झाल्याने सध्या शहर विविध समस्येला सामोरे जात आहे.

अस्वछतेचा कळस

पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेचे, वाहतूक बेटे, तसेच कॉलनी अंतर्गत रस्त्यांवरील गवत कापून परिसर स्वच्छ केला जातो. परंतु पावसाळा उलटून चार महिने झाले तरी अद्यापही स्वच्छता केली जात नाही. दुभाजक स्वच्छ नाही, सीबीएस, शालिमार, गोल्फ क्लब मैदान या सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास बसण्याचे प्रकार दिसत आहे.

श्‍वानांचा उच्छाद

जानेवारी ते डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत जवळपास आठ हजार श्‍वान निर्बिजिकरणाची प्रक्रिया पार पाडल्याचा दावा करण्यात आला असला तरी शहरात श्‍वानांचा उच्छाद वाढला आहे. विशेष करून संध्याकाळी हा उच्छाद ज्येष्ठांना त्रासदायक ठरत आहे.

अंधारात नवनगरे

एलईडी बसविण्याचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. संबंधित कंपनीला वारंवार सूचना देवूनही कामाची गती वाढत नाही. नवीन नगरे तसेच शहराच्या ग्रामिण भागात अंधाराचे साम्राज्य आहे. बंद पडलेल्या लाइट व खराब झालेले पोल बदलले जात नाही.

वैद्यकीय व्यवस्था निर्धास्त

कोरोनाकाळात वैद्यकीय व्यवस्थेचा कस लागला. चांगल्या पद्धतीने कामदेखील झाले. परंतु कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या आता आल्यानंतर वैद्यकीय विभाग निर्धास्त झाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचण्याची गती मंदावली आहे.

औषध फवारणीचा धूर दिसेना

उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढते हा दरवर्षाचा अनुभव असताना अद्यापही शहरात कुठेच औषध व धूर फवारणी होत नाही. संध्याकाळ नंतर डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे. नियमित स्वच्छता होत नसल्याने माशांचे प्रमाण वाढले आहे. घंटागाडी वेळेत व थांबत नसल्याने जागोजागी कचराकुंड्या निर्माण झाल्या आहेत. गंगाघाट, गोदावरी, नासर्डी, वालदेवी, वाघाडी या नद्या व उपनद्यांच्या कडेला दुर्गंधी, डासांचे प्रमाण वाढले आहे. पेस्ट कंट्रोल ठेक्याचा वाद न्यायप्रविष्ट असल्याचे कारण देवून चालढकल केली जात आहे.

विस्कळित पाणीपुरवठा

धरणात मुबलक पाणी साठा असला तरी जुने नाशिकसह सिडको भागात विस्कळित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात कमी तर काही भागात अधिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणी पुरवठ्याच्या वेळेतही फरक असल्याने वजनदार नेत्यांच्या भागात अधिक दाबाने पाणीपुरवठा होत आहे.

उद्यानांमध्ये अस्वच्छता

उद्याने स्वच्छतेचे काम कंत्राटदारांमार्फत होते. परंतु देयके काढण्यापुरते कंत्राट दार शिल्लक राहीले आहे. उन्हाळ्यात उद्यानांचा अधिक वापर होतो. परंतु अस्वच्छतेमुळे नागरिक उद्यानांमध्ये जात नाही. उद्यानामधील हिरवळ सुकली आहे. दुरुस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात आहे.

अतिक्रमणाचा कडेलोट

अनेक वर्षांपासून महापालिकेत अतिक्रमण विभाग अस्तित्वात आहे की नाही अशीच परिस्थिती आहे. अतिक्रमण अधिकारी पदावर सक्षम व्यक्ती नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. विद्यमान अतिक्रमण अधिकाऱ्यांनी शहर भर फिरून अतिक्रमणाचा आढावा घेणे अपेक्षित आहे. परंतु ते स्वतः फिरत नाहीच शिवाय त्यांच्यापर्यंत शहरात आलबेल परिस्थिती असल्याचे पोचविण्यात मधले अधिकारी यशस्वी ठरतात. परंतु, शहरात जागोजागी अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. त्यातून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडत आहे. नेहरू चौक, शालिमार, शिवाजी रोड, अशोक स्तंभ ते रविवार कारंजा, सीबीएस या भागात नित्याचेच अतिक्रमण असून आता सर्वच विभागात सार्वजनिक जागांवर अतिक्रमण वाढत आहे. विशेष म्हणजे नवीन रस्त्यांवर दुकाने थाटली जात आहेत. सहा विभागात अतिक्रमण विभागाचे भरारी पथक असले तरी पथक ज्या भागातून जाते त्या वेळेपुरते अतिक्रमण हटते, त्यानंतर मात्र परिस्थिती पुर्ववत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Virat Kohli याला आमची नाही, तर आम्हाला त्याची गरज...; जसप्रीत बुमराह नक्की काय म्हणाला, वाचा

Sangli Election Results : 83 जणांचे 'डिपॉझिट' जप्त, मातब्बर नेत्‍यांचा समावेश; सोळा लढले, बाकीचे फक्त नडले

CM Eknath Shinde: ''एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री करा'' महाराष्ट्रातील संतांच्या वंशजांचं पंतप्रधानांना पत्र

Latest Marathi News Updates : नागपूरमधील CM एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवासस्थानासमोरील नावाची पाटी काढली

SCROLL FOR NEXT