Nashik News : सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे कागदपत्रे विद्यार्थ्यांनी तयार ठेवावे. नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी आवश्यक सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे के. के. वाघ कृषी महाविद्यालयात आयोजित विभागीय सुसंवाद मेळाव्यात मार्गदर्शन करण्यात आले. (admission registration Guidance in departmental coordination meeting of CET Cell Nashik News)
याप्रसंगी कृषी व कृषी संलग्न शिक्षण, तंत्रशिक्षण, वैद्यकीय व उच्चशिक्षण पदवी प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली. मेळाव्यासाठी प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे, तंत्र शिक्षण विभागाचे समन्वयक राजेंद्र लोंढे,
कृषी शिक्षणाचे समन्वयक डॉ. मंगेश निकम, वैद्यकीय शिक्षणाचे समन्वयक डॉ. सिद्धेश नार, फाइन आर्टचे समन्वयक डॉ. विजय सपकाळ, के. के. वाघ शिक्षण संस्थेचे विश्वस्त व प्राचार्य डॉ. के. एन. नांदुरकर, कॅम्पस समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर व कृषी व संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. एस. एम. हाडोळे,
प्रा. एन. जी. देवशेटे, प्रा. व्ही. एस. संधान, डॉ. एन. एस. पाचपोर व डॉ. एच. व्ही. देशमुख आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री. लोंढे म्हणाले, की प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशाचा अर्ज सादर, प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, अर्ज भरताना घ्यावयाची काळजी, ऑप्शन फॉर्म भरण्याची पद्धत आदींची माहिती दिली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
डॉ. निकम यांनी कृषी प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती दिली. अर्ज भरताना घ्यावयाची काळजीबद्दल त्यांनी सविस्तर सादरीकरण केले. डॉ. सिद्धेश नार यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेचे महत्त्व तसेच इतर पॅरामेडिकल कोर्सविषयक माहिती दिली.
श्री. डांगे म्हणाले, की पालक व विद्यार्थ्यांनी प्रवेशापूर्वी माहिती पुस्तिकेचे वाचन करावे. तर महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवेश मान्यता प्रस्ताव सादर करावा. याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, अजिंक्य वाघ, प्रा. के. एस. बंदी, अशोक मर्चंट, चांगदेवराव होळकर, डॉ. एस. एस. साने, शकुंतला वाघ, डॉ. व्ही. एस. माने, एस. जी. ठाकरे, डॉ. प्रीती भामरे यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.