MBBS BDS Admission : वैद्यकीय शाखेतील एमबीबीएस आणि बीडीएस या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी पुढील दोन फेऱ्यांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर झाले आहे. प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झालेली असून, दुसऱ्या कॅप राउंडला गुरुवार (ता. २४)पासून सुरवात होत आहे.
नीट परीक्षेच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात असून, या प्रक्रियेची दोन टप्प्यांत विभागणी केलेली आहे. सध्या एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. (admission schedule for next 2 rounds for admission of MBBS and BDS degree courses has announced nashik news)
आयुष अभ्यासक्रमांच्या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. एमबीबीएस, बीडीएसच्या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. बुधवारी (ता. २३) रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आला असून, गुरुवार (ता. २४) पासून दुसऱ्या कॅप राउंडला सुरवात होणार आहे.
प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक, सहभागासाठी विद्यार्थ्यांच्या पात्रतेच्या अटी-शर्थीबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली असल्याचे सीईटी सेलतर्फे स्पष्ट केले आहे.
असे आहे प्रवेश वेळापत्रक
- दुसऱ्या कॅपसाठी ऑप्शन फॉर्म भरणे --------- २४ ते २६ ऑगस्ट
- दुसऱ्या कॅप राउंडची निवडयादी -------------- २९ ऑगस्ट
- प्रवेश निश्चितीची मुदत ---------------------- ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
- ऑनलाइन नोंदणी ---------------------------- ९ व १० सप्टेंबर
- नोंदणी शुल्क भरण्याची मुदत -------------- ९ ते ११ सप्टेंबर
- सर्वसामान्य गुणवत्तायादी प्रसिद्धी -------- १२ सप्टेंबर
- तिसऱ्या कॅप राउंडसाठी पर्याय नोंदविणे --- १३ व १४ सप्टेंबर
- तिसऱ्या कॅप राउंडची निवडयादी ------------ १५ सप्टेंबर
- प्रवेश घेण्यासाठीची मुदत -------------------- १६ ते २० सप्टेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.