Present with the winning student team at the MVIPR Cultural Festival. esakal
नाशिक

Nashik News : मविप्र सुरु करणार संगित महाविद्यालय, रेडिओ केंद्र : ॲड. नितीन ठाकरे

मविप्र सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी मिळाते.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मविप्र सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांना कला सादर करण्याची संधी मिळाते. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्‍या ठरतात.

करीअरच्‍या विविध संधी उपलब्‍ध करुन देणारे अभ्यासक्रम संस्‍थेतर्फे राबविले जात आहेत. (Adv Nitin Thackeray statement of Music College Radio Center to be started by MVP nashik news)

आगामी काळात संगित महाविद्यालय तसेच रेडिओ केंद्र सुरु करणार असल्‍याची घोषणा मविप्र संस्‍थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी शुक्रवारी (ता.१९) केली. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित जिल्‍हास्‍तरीय मविप्र सांस्‍कृतिक महोत्‍सवाच्‍या महाअंतिम फेरीतील पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

प्रसिद्ध शाहीर रामानंद उगले, संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती डी. बी. मोगल, संचालक रमेश पिंगळे, सेवक संचालक सी. डी. शिंदे, अप्पासाहेब उगले, पं. व्यंकटेश ढवण, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, प्रा. दौलत जाधव उपस्थित होते.

शाहीर उगले व सहकलाकारांनी ‘महाराष्ट्राची लोकगाणी’ हा पोवाडे आणि लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. यानंतर समूहगीत, वैयक्तिक गीत गायन, वैयक्तिक वाद्यवादन या सांस्कृतिक कला प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. शिक्षणाधिकारी डॉ. ढोके यांनी प्रास्ताविक केले.

सविता जाधव, सविता आहेर यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी प्रा. दौलत जाधव यांनी आभार मानले. किल्ले बनवा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्‍कार झाला. कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील विभूती पं. भवानी शंकर, उस्ताद राशीद खान, डॉ. प्रभा अत्रे, विठ्ठल क्षीरसागर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

लोककला जीवन राहणार : उगले

मविप्र संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण उत्‍कृष्ट पातळीचे आहे. हे सादरीकरण पाहताना महाराष्ट्राची लोककला कायम जीवंत राहिल, असा विश्‍वास शाहीर रामानंद उगले यांनी व्‍यक्‍त केला. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्‍यांना प्रोत्‍साहित केले.

सांस्कृतिक महोत्सव निकाल असा-

*समूहनृत्य : प्राथमिक विभाग- अभिनव बालविकास मंदिर, सिन्नर. माध्यमिक विभाग- मराठा हायस्कूल.

* वैयक्तिक गीत गायन : प्राथमिक विभाग- होरायझन अकॅडमी, निफाड. माध्यमिक विभाग- माधवराव बोरस्ते विद्यालय, निफाड.

* समूहगीत माध्यमिक विभाग- जनता विद्यालय, सातपूर.

* वैयक्तिक वाद्यवादन माध्यमिक विभाग- केआरटी हायस्कूल, मौजे सुकेणे.

किल्ले बनवा निकाल : प्रथम-जनता विद्यालय सातपूर (रायगड), द्वितीय- जनता विद्यालय पवननगर (शिवनेरी), तृतीय- जनता विद्यालय, गांधीनगर (पन्हाळा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे उमेदवार विनोद शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे भाजपकडून असलेले उमेदवार हेमंत रासने यांची विजयाच्या दिशेने घौडदौड

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT