Speaking at the review meeting organized by Baglan Taluka and Satana City, Adv. Ravindra Pagar Neighbor Sanjay Chavan, Keshav Mandwade, Rajendra Sonwane, Yashwant Shirasath, Umesh Khatale, Vilas Sanap, Sunil Aher etc. office bearers and activists. esakal
नाशिक

Mahavikas Aghadi: निवडणुकांमध्ये आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हा : ॲड. रवींद्र पगार

सकाळ वृत्तसेवा

Mahavikas Aghadi : देशवासीयांना खोटी स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या भाजपने नऊ वर्षांत सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला. महाराष्ट्रात तर घटनाबाह्य व अनैतिक पद्धतीने सत्ता मिळविली.

जनसामान्यांचे, शेतकऱ्‍यांचे प्रश्न सोडविण्याची ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारमध्येच असून आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार यांनी केले. (Adv Ravindra Pagar statement Get ready to hoist front flag in elections Nashik News)

येथील बाजार समिती सभागृहात सटाणा शहर व बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित आढावा बैठकीत अॅड.पगार बोलत होते. यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, यशवंतराव शिरसाठ, उमेश खातळे, विलास सानप, सुनील आहेर आदि व्यासपीठावर होते.

अॅड.पगार म्हणाले, बागलाण तालुक्यात गारपिटीमुळे शेतकऱ्‍यांचे होत्याचे नव्हते झाले. त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी शिंदे-फडणवीस सरकार ‘गतिमान सरकार कारभार वेगवान’ नावाने जाहिरातबाजी करण्यात व्यस्त होते.

मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी केले. आता राज्यातील आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितरीत्या लढविणार असल्याने पक्षासाठी तळमळीने आणि झोकून देत काम करणाऱ्‍या निष्ठावंत यांनाच उमेदवारीची संधी दिली जाईल.

असेही अॅड.पगार यांनी स्पष्ट करत धुळे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असल्याने हा मतदारसंघ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा अशी मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे अॅड. पगार यांनी सांगितले.

माजी आमदार संजय चव्हाण म्हणाले, अवकाळीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा राहिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मदतीच्या घोषणेला चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे.

तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी प्रास्ताविक केले. यशवंत कात्रे, ज.ल.पाटील, फईम शेख, संजय पवार, जिभाऊ सोनवणे, यशवंतराव शिरसाठ, उमेश खातळे, विलास सानप, रायुकाँ तालुकाध्यक्ष चारुदत्त खैरनार, प्रा.ठोके, राजेंद्र ठोके आदींची भाषणे झाली.

बैठकीस कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, विजयराज वाघ, पांडुरंग सोनवणे, संजय बिरारी,डॉ.व्ही.के.येवलकर, सुयोग अहिरे, सुमीत वाघ, अमोल बच्छाव, किरण पाटील, रोहित अहिरे, समता परिषदेचे वैभव गांगुर्डे, प्रसाद दळवी, केदा भामरे, भिका सोनवणे, संजय सोनवणे, मयूर अहिरे, राजेंद्र सावकार, गब्बर सोनवणे, आकाश पगार, किशोर खैरनार, हरिभाऊ खैरनार, बाळासाहेब देवरे, संजय वाघ, भारत काटके, विवेक सोनवणे, बाळासाहेब भांगडीया, भाऊसाहेब भामरे, केशव सोनवणे, दीपक रौंदळ, निखिल खैरनार आदींसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT