नाशिक

Nashik News: नाशिक विकायचे आहे? सोशल मीडियावरून नेटकऱ्यांचा संताप; खासदार, आमदारांचा निषेध

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: दिवाळीच्या धामधुमीत सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना याच सोशल मीडियावरून सध्या नाशिक विकायचे आहे? अशी जाहिरात प्रसिद्ध केली जात आहे.

या माध्यमातून नेटकरी पायाभूत सुविधांचा प्रश्न प्रकर्षनाने मांडताना नाशिकमधून पळविले जात असलेल्या प्रकल्पांवर बोट ठेवत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींना जबाबदार धरले जात असून, एक्स (ट्विटर) वर टॅग केले जात आहे. (advertisement is being published on social media that Nashik is to be sold news)

मुंबई-पुणेप्रमाणे नाशिकला खमके राजकीय नेतृत्व नसल्याने शासनदरबारी एखादी समस्या सोडविण्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. एखाद्या मोठा प्रकल्पासाठी शासनदरबारी झगडणारी व्यक्ती नाही किंवा दूरदृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प आणणारे नेतृत्वही नाही, अशी खंत अनेक वर्षांपासून नाशिककर व्यक्त करीत आहेत.

आता ही खंत थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रमकपणे मांडली जात आहे. नवीन प्रकल्प सोडा, आहे त्या प्रकल्पांची लागलेली वाट किंवा मुंबईहून नाशिकला येताना महामार्गाची झालेली वाताहात यावरून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. ऐन दिवाळीत नेटकऱ्यांनी ‘नाशिक विकायचे आहे’ अशी जाहिरात करून लोकप्रतिनिधींच्या अकार्यक्षमतेवरच बोट ठेवले आहे. भाजपची सत्ता असताना २०१७ मध्ये मोठी आश्वासन दिली गेली.

राज्य शासनात प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी नाशिकसाठी मोठी आश्वासने दिली. त्या आश्वासनांचा विसर पडल्याचे नेटकरी एक्स (ट्विटर) वरून सांगत आहेत. नाशिक-मेट्रो प्रकल्पाची घोषणा झाली. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. परंतु अद्यापही कामे न झाल्याने नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसली गेल्याचा आरोप होत आहे.

नाशिक-मुंबई महामार्गाचे विस्तारीकरण असो वा नाशिक-पुणे महामार्गाचे सहापदरीकरण येथील समस्यांवर बोट ठेवताना प्रकल्प का झाले नाहीत, असा सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे अखेरीस संतप्त नेटकऱ्यांनी नाशिक विकायचे आहे, अशी जाहिरात करत लोकप्रतिनिधींचा निषेध केला.

रस्ते प्रवासावरून संताप

दिवाळीनिमित्त मुंबईहून नाशिकला येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. महामार्गाची वाताहात झाल्याने रेल्वेमार्गाचा वापर झाला. परंतु रेल्वे फुल झाल्याने नाइलाजाने रस्ते महामार्गाचा वापर करावा लागला. दीडशे किलोमीटर पार करण्यासाठी चार ते पाच तास लागत असल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला. अशीच अवस्था नाशिक-पुणे महामार्गाची पाहायला मिळते.

अन्य शहरांची उदाहरणे

नाशिक मेट्रो निओ, नाशिक-मुंबई एक्स्प्रेस वे, नाशिक-पुणे एक्स्प्रेस वे, मनमाड-इंदूर रेल्वे, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे, नाशिक विकास प्राधिकरण, आंतरराष्ट्रीय विमानतळ, आयटी पार्क, नाशिक इलेक्ट्रिकल हब अशा न झालेल्या प्रकल्पांची यादी नेटकऱ्यांनी एक्स (ट्विटर) वर टाकताना मध्य प्रदेश निवडणुकीचे निमित्त करून तेथील प्रकल्पांची यादी टाकली आहे.

त्यात तेथे होऊ शकते, नाशिकला का नाही, असा सवालही करण्यात आला आहे. विंध्या एक्स्प्रेस वे, नर्मदा, अटल प्रगती, मालवा निमार या महामार्गांच्या प्रगतीची छायाचित्रे सोशल मीडियावरून टाकत लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT