Camels esakal
नाशिक

Nashik News: पांजरपोळ येथून 16 दिवसांनंतर उंट निघाले राजस्थानच्या परतीला! 12 उंटांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटी परिसरातून जप्त करण्यात आलेली १११ उंट सोळा दिवसांनंतर पांजरपोळ येथून पुन्हा राजस्थानला निघाली आहेत. (After 16 days from Panjarpol camels left for Rajasthan 12 camels died Nashik News)

जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतलेले उंट पांजरपोळ येथून राजस्थानकडे आपल्या मायदेशी शुक्रवारी रवाना करण्यात आलेत. गेल्या सोळा दिवसांपासून या उंटांना नाशिकच्या पांजरपोळ येथे संगोपनासाठी ठेवण्यात आले होते.

मात्र महाराष्ट्राचे वातावरण उंटांसाठी उपयुक्त नसल्याने मागील १६ दिवसांत यातील १२ उंटांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सदर उंटांना आपल्या मायदेशी पुन्हा घेऊन जावे, अशी मागणी प्राणिमित्रांकडून करण्यात आली होती. अखेर उंटांना मायदेशी पाठविण्यात आल्याने नागरिकांसह प्राणिमित्रांनी समाधान व्यक्त केले आहे.

धरमपूर (जिल्हा बलसाड, गुजरात) येथील श्रीमान रामचंद्र मिशन या संस्थेने उंटांना राजस्थानला पोचविण्यासाठी तसेच उंटांच्या अन्न-पाण्याचा येण्या-जाण्याचा खर्च करणार असल्याबाबतचा पाठपुरावा नाशिकच्या जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी केला होता.

अखेर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर संस्थेने उंटांना नेण्याकरिता सात रायका गुरुवारी (ता. १८) नाशिकमध्ये पाठविले होते. या रायकांच्या मदतीने शुक्रवारी (ता. १९) सकाळी साडेदहाच्या सुमारास पांजरपोळ येथील ९९ पैकी ९८ उंटांना राजस्थानकडे पाठविण्यात आले आहे. वयोवृद्ध उंट जखमी असल्याने त्याला पांजरपोळ येथेच ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शुक्रवारी सकाळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी गिरीश पाटील, डॉ. वैशाली थोरात, डॉ. अनंत साखरे यांनी पांजरपोळ येथे भेट दिली. त्यानंतर व्यवस्थापक विठ्ठल आगळे यांना पत्र मिळाले. जिल्हाधिकारी यांच्याकडील पत्र रायकांना दिल्यानंतर उंट राजस्थानकडे रवाना झाले.

रायका हे उंट वणीमार्गे घेऊन जाणार आहेत. यात दररोज वीस ते पंचवीस किलो मीटर प्रवास करणार आहेच. पंचवीस दिवसांत राजस्थान येथे उंट पोचणार असल्याची माहिती रायका यांनी दिली. आज दिवसभर चालून वणी येथे विश्रांतीसाठी उंटांना थांबविण्यात येणार आहे.

त्यानंतर उंबरपाडा, बोरगाव, सापुतारा आणि त्यानंतर बलसाड गुजरात येथील धरमपूरमध्ये असणाऱ्या श्रीमान रामचंद्र मिशन या गोशाळेत, आश्रमात उंटांना तीन ते चार दिवसांच्या विश्रांतीसाठी, तसेच अधिक उपचारासाठी ठेवण्यात येणार आहे.

त्यानंतर येथून पुन्हा राजस्थानच्या महावीर उंट अभयारण्यात सिरोही येथे उंटांचे प्रस्थान असणार आहे. सदर उंटांचे याच ठिकाणी संगोपन देखील होणार आहे. दरम्यान, विश्रांतीच्या ठिकाणचा अन्न-पाणी, औषधोपचाराचा, तसेच रायकांचा सर्व खर्च श्रीमान रामचंद्र मिशन या संस्थेने घेतला आहे.

उंटांच्या कथित तस्करीचा प्रकार लक्षात घेता उंट ताब्यात घेऊन पांजरपोळ येथून ती पुन्हा त्यांच्या मूळ सहवासात जात आहेत. परंतु इतके दिवस उलटून गेल्यानंतरही हे उंट कोणी आणले, कशासाठी आणले, यांचं काय होणार होतं या प्रश्नांची उत्तरे अजूनही अनुत्तरीत आहेत.

नाशिक हे उंट तस्करीचे केंद्रबिंदू तर ठरत नाही ना, या प्रश्नाचे उत्तर मिळेल का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT