Avinash Shinde, Metropolitan Chief of Vanchit Bahujan Aghadi, being taken away by the police during the protest. esakal
नाशिक

Nashik News: ‘वंचित’च्या दणक्यानंतर समस्या होणार दूर! MIDCतील रस्ते रुंदीकरण, बेकायदा पार्किंगला आळा

बेकायदा पार्किंगला आळा घालणे, अरुंद रस्त्यांचे त्वरित रुंदीकरण, मोडकळीस आलेल्या पुलाचे त्वरित नूतनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडून महापालिका आयुक्तांना त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : उद्योजक, कामगार, कर्मचाऱ्याच्या न्याय हक्कासाठी, सातपूर व अंबड येथे रस्त्याच्या कडेला बेकायदा पार्क केलेल्या वाहनांना लगाम घालण्यास तसेच मृत्यूचा सापळा बनलेले अरुंद रस्ते व मोडकळीस आलेले कमकुवत पूल याकडे लक्ष वेधण्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे व सचिव बजरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २४ जानेवारीला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यानंतर बुधवारी (ता. ७) स्मरणपत्र दिल्यानंतर आता महापालिका प्रशासनास जाग आली असून, रस्ता रुंदीकरण तसेच पुलाच्या नूतनीकरण व मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (After bang of Vanchit problem will be solved Road widening in MIDC urb illegal parking Nashik News)

बेकायदा पार्किंगला आळा घालणे, अरुंद रस्त्यांचे त्वरित रुंदीकरण, मोडकळीस आलेल्या पुलाचे त्वरित नूतनीकरण करण्याच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडून महापालिका आयुक्तांना त्याबाबतचे निवेदनही देण्यात आले होते.

यानंतर या कामांच्या पूर्ततेबाबत काय झाले याची विचारणा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेतली.

याप्रसंगी माजी नगरसेविका ज्योती शिंदे, माजी नगरसेवक संजय साबळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहिते, महानगर महासचिव संदीप काकळीज, महानगर सचिव बजरंग शिंदे, उपमहानगरप्रमुख सुनील साळवे, सूरज गांगुर्डे आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले.

आयुक्तांनी तातडीने अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी तसेच शहर अभियंता शिवकुमार वंजारी, नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता संजय आग्रवाल तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाचारण केले.

औद्योगिक वसाहतीतील अरुंद रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण करण्याच्या कामाचे इस्टिमेट सादर करण्याच्या सूचना दिल्या. मोडकळीस आलेल्या कमकुवत पुलांची नूतनीकरण, तसेच सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत ठिकठिकाणी रस्त्यांच्या कडेला बेकायदा पार्क केली जाणारी वाहने त्वरित हटविण्याचे आदेशही आयुक्तांनी दिल्याचे अविनाश शिंदे यांनी सांगितले.

आपल्या मागण्यांबाबत आयुक्तांनी तातडीने लक्ष दिल्याबद्दल शिंदे यांनी आयुक्तांचे अभिनंदन केले. लवकरात लवकर सर्व कामे पूर्ण होतील आणि उद्योजक, कर्मचारी, कामगारांच्या जीविताचे रक्षण केले जाईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी दीपक पगारे, प्रकाश साळवे, संतोष सिंग, शशी ढिकले, देवीदास अहिरे, संतोष जाधव, विठ्ठल साळवे, शंकर जाधव, अप्पा आव्हाड, विक्रम शिंदे, कैलास सोनवणे, चेतन पगारे, सचिन खैरनार, शुभम कौसे, विशाल भवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

Pune Crime: पुण्यातील 'त्या' 5 मुलींनी घेतला मोकळा श्वास, पोलिसांची मोठी कारवाई

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

SCROLL FOR NEXT