Bham Dam overflowed esakal
नाशिक

Nashik Rain Update: भावलीपाठोपाठ भाम धरणही ओव्हेरफ्लो! सलग पाचव्या वर्षी धरण ओसंडून वाहू लागल्याने समाधान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Rain Update : इगतपुरी तालुक्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस असल्याने दारणा धरण समूहाच्या धरणसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. भावली पाठोपाठ भाम धरणही ओसंडून वाहू लागले आहे.

या धरणाची क्षमता जवळपास पावणेतीन टीमसी असून सलग पाचव्या वर्षीही धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत हे धरण भरण्यास जवळपास पंधरा दिवस उशीर झाला, तरीही धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. (After Bhavali bham Dam overflow dam overflowed for fifth year in row nashik news)

नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या दारणा धरण समूहात दारणा, भावली, वाकी, भाम या धरणांच्या पाण्याचा समावेश होतो. त्यामुळे या धरणांच्या जलसाठ्याकडे शासनाचे विशेष लक्ष लागून असते.

इगतपुरी तालुक्यात महिनाभरापासून सतत सुरू असलेला संततधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील सर्वच लहानमोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात विशेषता पश्चिम पट्यात मुसळधार पाऊस झाल्याने दारणा धरण भरल्यात जमा आहे. दहा दिवसांपूर्वीच भावली धरण भरले. त्यात आज शुक्रवारी (ता.४) पहाटे भाम धरणही ओव्हरफ्लो झाल्याने दारणा नदीपात्र खळखळून वाहू लागले आहे.

भाम, भावली, वाकी या नद्यांचे पाणी दारणा धरणात समाविष्ट होत असल्याने दारणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

भाम धरण हे इगतपुरी तालुक्यातील काळुस्ते खोऱ्यात निर्माण झाले असून पाच वर्षांपूर्वीच या धरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे सलग पाचव्या वर्षीही हे धरण जलदगतीने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT