नाशिक : आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेने (Constant Rain) रविवारी (ता. १७) विश्रांती घेतली. सकाळी लख्ख ऊन पडले.
पावसाच्या (Rain) रिपरिपमुळे त्रस्त नागरिकांनी रविवारी विकेंड पर्यटनाचा (Tourism) आनंद घेतला. प्रशासनाने जागोजागी प्रतिबंध केलेला असताना, मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनाला बाहेर पडले. (After break from rains weekend tourism rushes Nashik Latest Marathi news)
दरम्यान, पश्चिम पट्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पाऊस सुरू आहे. जायकवाडी धरण जवळपास ६५ टक्के भरले आहे. धरणात पडणाऱ्या पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गाचे प्रमाण कमी केले आहे.
गोदावरी काठच्या व्यवसायिकांना पूर कमी होण्याची चिंता लागून आहे. रविवारी लख्ख उन पडल्याने लोक फिरायला निघाले. गोदावरीच्या पुरामुळे अनेकांच्या बेसमेंटमध्ये पाणी साचले आहे.
दुकानांमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी व्यवसायिकांची लगबग सुरू झाली, तर अनेकांचे मात्र पाणी कमी होण्याकडे लक्ष लागून आहे. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर चिखल, पाणी काढायची लगबग सुरू होती.
पावसाळी पर्यटनाचा ट्रेंड
यंदाच्या हंगामात जुलै महिन्यात पावसाने सगळे विक्रम मोडले. सगळ्याच तालुक्यात शंभर टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरण ७० ते ८० टक्के भरले आहेत. त्यामुळे आठवडाभराच्या संततधार पावसाने घरात कोंडून घ्यावे लागलेल्या नागरिकांनी रविवारच्या सुट्टीच्या उघडीपानंतर घराबाहेर फिरण्याला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले.
खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसह किल्ल्यावर जाण्याला प्रतिबंध केला. ग्रामीण पोलिसांनी जागोजागी पोलिस बंदोबस्त लावून नागरिकांना अडविण्याचे नियोजन केले. तरीही लोकांनी पर्यटन ठिकाण बदलून त्यांची विकेंडच्या पावसाळी ट्रीपची हौस भागवून घेतली.
बंदीमुळे हिरमोड
नागरिकांनी त्यांच्या सोयीने पर्यटनस्थळांना भेटी देत पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतला, तरी त्याचवेळी अनेक ठिकाणांवर बंदीमुळे नागरिकांना जाता आले नाही.
वन विभागाने त्र्यंबकेश्वर मार्गावरील पहिने, दुगारवाडी, हरिहर किल्ला, भास्करगड, वाघेरा, बाहुली, त्रिंगलवाडी, कुरुंगवाडी व अंजनेरी गडावर पावसाळ्यामुले भाविकांसाठी प्रतिबंध केला आहे. त्यामुळे प्रतिबंध असलेल्या ठिकाणी नियोजन केलेल्यांचा हिरमोडही झाला. पोलिस बंदोबस्त असल्याने अनेकांना त्यांचा विकेंड पावसाळी पर्यटनाचा प्लॅन बदलावा लागला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.