Malegaon municipal Corporation esakal
नाशिक

Nashik News : कार्यारंभ आदेशानंतरही सुरू न झालेली कामे स्थगित! मालेगाव मनपा आयुक्तांचा दणका

महानगरपालिकेत आर्थिक शिस्तीसाठी मनपा निधीतील कार्यादेश प्रदान करूनही अद्यापपर्यंत सुरू न झालेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : महानगरपालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहरातील महत्वकांक्षी व मोठ्या प्रकल्पांचा हिस्सा, व्याज, वेतन, दरमहा खर्च वाढतच आहे. अशातच मालमत्ता, संकीर्णकर व नळपट्टी वसुलीचे आव्हान आहे.

उत्पन्न वाढीसाठी कुठल्याही उपाययोजना सध्या नाहीत. यामुळे महानगरपालिकेत आर्थिक शिस्तीसाठी मनपा निधीतील कार्यादेश प्रदान करूनही अद्यापपर्यंत सुरू न झालेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी घेतला आहे. (after order to start work works have not started suspended Malegaon Municipal Commissioners action Nashik News)

श्री. जाधव यांनी महानगरपालिकेत आर्थिक शिस्त लावण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यात मनपा निधीतील कार्यारंभ आदेश दिलेले तथापि आजतागायत काम सुरू न झालेल्या कामांना तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश दिल्याने संबंधित ठेकेदारांचे धाबे दणाणले आहे.

या आदेशानुसार सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील मनपा निधीतील मंजूर करण्यात आलेली, कार्यारंभ आदेश दिलेली मात्र काम सुरु नसलेल्या कामांची यादी ३ दिवसाचे आत आयुक्तांना सादर करावयाची आहे.

विभाग प्रमुखांनी प्रथमत: अशा प्रकारच्या कामांपैकी आवश्यक कामे आयुक्त तथा प्रशासक यांची मान्यता घेऊनच सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

मनपा निधीच्या कामांना स्थगितीबरोबरच सर्वाधिक महत्वकांक्षी व प्रस्तावित भूमिगत गटार व प्रस्तावित पाणी पुरवठा योजना या कामांना देखील तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

दायित्वाचा तपशील सात दिवसात द्या

आयुक्तांच्या आदेशातून केंद्र शासन व राज्य शासन अनुदानित उर्वरित कामे वगळण्यात आलेली आहेत.

तसेच जी कामे मनपा निधीतून सुरू असून प्रगतिपथावर आहेत, अशा कामांची अंदाजपत्रकीय रक्कम, अपेक्षित खर्च, त्यापैकी झालेला खर्च व भविष्यातील दायित्वाबाबतची माहिती देखील सर्व संबंधित विभाग प्रमुख यांच्याकडून लेखा विभागास व आयुक्त कार्यालयास सादर करण्याच्या सूचना लेखा विभाग व संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.

भुयारी गटार आणि पाणी योजना या दोन कामांव्यतिरिक्त सध्या निर्माण झालेल्या दायित्वाचा तपशील सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पाणीयोजना, गटार महत्त्वाचीच

मनपाची आर्थिक घडी बसवण्यासाठी घेतलेला हा निर्णय रोगापेक्षा उपाय जालीम असा व्हावयास नको. भुयारी गटार व पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी मोठ्या काळानंतर मंजुरी व निधी मिळाला आहे.

मुळातच भुयारी गटार कामात अनंत अडथळे आल्याने एक वर्ष विलंब झाला आहे. पाणीपुरवठा चणकापूर ते जलशुद्धीकरण केंद्र थेट जलवाहिनी व भुयारी गटार ही दोन प्रमुख कामे होणे शहरहितासाठी आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT