vaccine esakal
नाशिक

वेळेतच घ्या कोरोना लसीचे दोन्‍ही डोस! तज्‍ज्ञांचा अंदाज

अरूण मलाणी

नाशिक : कोरोनापासून (coronavirus) बचावासाठी सतर्कता अन्‌ प्रतिबंधक लस घेणे हेच उपाय सध्यातरी आहेत. लसीकरणानंतर लागण होणारच नाही, हा गैरसमजही पाळायला नको. वेळापत्रकानुसार दोन्‍ही डोस घ्यावेत. लसीकरणानंतर साधारणतः दोन आठवड्यांच्‍या कालावधीत शरीरात अपेक्षित ॲन्टिबॉडीज्‌ विकसित झालेल्‍या असतात, असाही अंदाज अभ्यासातून समोर येत आहे. ( after-vaccine-two-weeks-for-antibodies-nashik-marathi-news)

तज्‍ज्ञांचा अंदाज - वेळेतच दोन्‍ही डोस घेण्याचे आवाहन

लसीकरणाबाबत अनेक गैरसमज आहेत. या पार्श्वभूमीवर तज्‍ज्ञांकडून याविषयी सखोल माहिती जाणून घेतल्‍यावर अनेक बाबी समोर आल्‍या. तज्‍ज्ञांच्‍या म्‍हणण्यानुसार कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतल्‍यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासून हळूहळू शरीरातील ॲन्टिबॉडीज्‌चे प्रमाण वाढण्यास सुरवात होते. निर्धारित मुदतीनंतर दुसरा डोस घेतला, तर ॲन्टिबॉडीज्‌चे प्रमाण वाढत जाते. या उलट दुसरा डोस घेण्यास विलंब केल्‍यास अपेक्षित प्रमाणात ॲन्टिबॉडीज विकसित होण्याबाबत साशंकता निर्माण होऊ शकते.

ॲन्टिबॉडीज्‌ लेव्‍हर तपासणी...

लसीकरण करून निर्धारित मुदत पूर्ण केलेल्‍या व्‍यक्‍ती आपला ॲन्टिबॉडीज्‌ स्‍कोर तपासून पाहू शकतात. तपासणीवेळी वापरल्या जाणाऱ्या किटनुसार ‘कट ऑफ व्‍हॅल्‍यू’ बदलतो. तरीही १.५ इंटरनॅशनल युनिटच्‍या वर स्‍कोअर राहिल्‍यास शरीरात मुबलक ॲन्टिबॉडीज्‌ विकसित झाल्‍याचा निष्कर्ष काढला जातो.

गुंतागुंत होण्याचे प्रमाण कमी

लसीकरण झाले म्‍हणजे कोरोनाची लागण होणार नाही, हा निव्वळ गैरसमज आहे. विषाणूशी संपर्क आल्‍यास कोरानाची लागण होऊ शकते, पण लसीकरणामुळे ॲन्टिबॉडीज्‌ विकसित झाल्‍याने अशा व्‍यक्‍तींना सौम्‍य लक्षणे जाणवू शकतात व रुग्‍णालयात दाखल करण्यासारखी गंभीर परिस्‍थिती टाळता येऊ शकते, असे तज्‍ज्ञांचे म्‍हणणे आहे.

कोरोना महामारीत प्रत्‍येकाने लसीकरण करून घ्यावे. दोन्‍ही डोस निर्धारित वेळेत घेतल्‍यामुळे शरीरात ॲन्टिबॉडीज्‌ विकसित होतात. त्यामुळे कोरोनाचा संभाव्‍य धोका कमी होतो. आरोग्‍याविषयी गुंतागुंत टाळता येऊ शकते. -डॉ. नीता गांगुर्डे, विभागप्रमुख, सूक्ष्मजीवशास्‍त्र विभाग, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT