NCP vs BJP  esakal
नाशिक

Nashik Political: BJPने उठविलेल्या कामांवर NCPकडून पुन्हा स्थगिती

स्थगिती खेळात सिन्नरमधील पर्यटनच्या 50 कोटींच्या कामांना ‘खो’

सकाळ वृत्तसेवा

Nashik Political : राज्यातील पर्यटन विभागाच्या कामांवरील स्थगितीचा फेरा सुरूच आहे. तब्बल सव्वा वर्षापासून या कामांवर असलेली स्थगिती याच महिन्यात सत्ताधारी भाजपने उठविली आहे.

मात्र, ही स्थगिती उठवून १५ दिवसांचा कालावधी होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेसने या कामांवर स्थगिती आणली आहे. पर्यटन विकास विभागांतर्गत सिन्नर तालुक्यातील जवळपास ५० कोटींची कामे बदलायची असल्यामुळे त्याची पुढील कार्यवाही करू नये, असे पत्र सिन्नरचे आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा नियोजन समिती तसेच जिल्हा परिषदेला दिले आहे.

त्यानुसार दोन्ही विभागांनी कामांची यादी तयार करून आमदारांच्या सूचनेनुसार माहिती संकलित करून ती मंत्रालयास पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. (Again adjournment by NCP on works raised by BJP Nashik Political)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

महाविकास आघाडी सरकार जून २०२२ मध्ये अल्पमतात आल्यानंतर सर्वच मंत्रालयांनी अनेक कामांना मंजुरी दिली होती. त्यात पर्यटन मंत्रालयानेही मोठ्या संख्येने कामे मंजूर केली. त्यानंतर नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर या कामांना स्थगिती दिली होती.

या स्थगिती दिलेल्या कामांमध्ये पर्यटन विभागाची एक हजार ३२६ कोटींची कामे होती. या कामांपैकी केवळ ५० कोटींच्या कामांवरील स्थगिती मार्च २०२३ मध्ये उठविण्यात आली होती.

दरम्यान, पर्यटन विकास मंत्रालय गिरीश महाजन यांच्याकडे आल्यानंतर पर्यटन विकास विभागाने ९ व १२ सप्टेंबरला शासन निर्णय प्रसिद्ध करून ४४८ कोटींच्या कामांवरील स्थगिती उठवली आहे.

यामुळे वर्षभरापासून स्थगिती उठवण्यासाठी मुंबईत चकरा मारत असलेल्या ठेकेदारांनी आता ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्यास सुरवात केली असतानाच आमदार अॅड. कोकाटे यांनी जिल्हा नियोजन समितीला पत्र देऊन पर्यटन विभागाने मंजूर केलेल्या या कामांच्या सद्यःस्थितीबाबत अहवाल मागवला.

त्यात किती कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे, किती कामे सुरू आहेत, किती कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहेत, याबाबतची माहिती तसेच सिन्नर तालुक्यातील कामांमध्ये बदल करायचा असल्याने निविदा प्रक्रिया सुरू न झालेल्या कामांबाबत पुढील कारवाई करू नये, असे पत्र दिले.

या कामांमध्ये बदल करायचा असल्यामुळे त्याचा प्रस्ताव तयार करून तो पर्यटन मंत्रालयास पाठवावा, अशाही सूचना दिल्या. या पत्रामुळे जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेस पत्र पाठवून स्थगिती उठलेल्या सिन्नर तालुक्यातील कामांचा अहवाल मागवला आहे.

यात जवळपास २५ कोटींच्या कामांना अद्याप तांत्रिक मान्यता दिलेली नसून त्यांची निविदा प्रक्रिया सुरू झाली नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्हा नियोजन समितीला सादर केला आहे.

सिन्नरमध्ये ८६ कोटींची कामे

पर्यटन मंत्रालयाने मंजूर केलेल्या कामांमध्ये तब्बल ८६ कोटींची कामे एकट्या सिन्नर तालुक्यातील आहेत. या कामांपैकी बहुतांश कामे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्या माध्यमातून मंजूर झाली आहेत.

आता राज्यात भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचाही एक गट सहभागी झाला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ॲड. कोकाटे यांनी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंजूर केलेली कामे बदलण्याचा घाट घातला आहे.

यातून महायुती सरकारमधील राष्ट्रवादी शिवसेनेमधील सत्तासंघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT